नगर जिल्हातील घटना; मुलीला फूस लावून पळविले आरोपी विरुद्ध कारवाई न झाल्यास कुटुंबीयांचा आत्मदहनाचा इशारा. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, June 3, 2023

नगर जिल्हातील घटना; मुलीला फूस लावून पळविले आरोपी विरुद्ध कारवाई न झाल्यास कुटुंबीयांचा आत्मदहनाचा इशारा.

 नगर जिल्हातील घटना; मुलीला फूस लावून पळविले आरोपी विरुद्ध कारवाई न झाल्यास कुटुंबीयांचा आत्मदहनाचा इशारा.


अहमदनगर -
नगर जिल्ह्यातील शेवगाव येथे दि. 30 एप्रिलला शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता की संतोष साळवे व महेश साळवे यांनी अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेले. असा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर फिर्यादी सुशिलाबाई साईनाथ सरोदे यांनी शेवगाव पोलीस ठाण्यात वारंवार सांगूनही व गुन्हा दाखल करूनही शेवगाव पोलिसांनी याची कुठलीही दखल घेतली नाही. यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे मागणीचे निवेदन पोलीस अधीक्षक यांना सुशीला बाई सरोदे यांनी दिले.तसेच आरोपी संतोष साळवे व महेश साळवे यांनी माझ्या मुलीचे अपहरण केले असूनही पोलिसांनी आरोपींना अद्यापही अटक केले नाही. शेवगाव पोलीस ठाणे यारो पण विरुद्ध जाणीवपूर्वक कारवाई करत नाही तसेच माझी मुलगी हिच्या जीवदास या आरोपींपासून धोका निर्माण झाला आहे तरीही पोलिस अधीक्षक यांनी जातीने लक्ष घालून यांच्यावर कठोर कारवाई करावी अन्यथा येत्या 6 जूनला आपल्या कार्यालयासमोर कुटुंबासह आत्मदहन आंदोलन करण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे . यावेळी सुशिलाबाई सरोदे व सरोदे कुटुंबीय हे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment