संत निवृत्तीनाथांच्या पालखीचे साकतमध्ये जल्लोषात स्वागत. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, June 16, 2023

संत निवृत्तीनाथांच्या पालखीचे साकतमध्ये जल्लोषात स्वागत.

 संत निवृत्तीनाथांच्या पालखीचे साकतमध्ये जल्लोषात स्वागत.अविनाश निमसे
अहमदनगर : श्री संत निवृत्तीनाथ पालखी सोहळ्याचे शुक्रवारी (दि.१६) सायंकाळी साकत खुर्द येथे फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोषात स्वागत करण्यात आले.
नगरमधील दोन दिवसांच्या मुक्कामानंतर रविवारी सकाळी निवृत्तीनाथ दिंडी सोहळा साकत खुर्द येथे मुक्कामासाठी दाखल झाला. रविवारी सकाळपासूनच साकत खुर्द येथील वातावरण भक्तिमय झाले होते. सायंकाळी पालखी सोहळा साकत खुर्द येथे आल्यानंतर ग्रामस्थांनी फटाके वाजवत मोठया जल्लोषात पालखीचे स्वागत केले तसेच ग्रामस्थांनी पालखीला खांद्यावर घेऊन मोठया भक्तिभावाने गावात आणले.  'ज्ञानोबा तुकाराम' च्या जयघोषाने  ग्रामस्थांचा आनंद गगनात मावेनासा झाला.
सायंकाळी पालखीचे विधिवत पूजन करण्यात येऊन कीर्तन सोहळा पार पडला. यानंतर दिंडी सोहळ्यातील सर्व भाविक भक्तांना आमटी-भाकरीचा महाप्रसाद देण्यात आला आमटी भाकरी महाप्रसादाची परंपरा पालखी स्थापनेपासून अद्यापही सुरूच असून, घेतले.
त्यास ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. यासाठी गावातील प्रत्येक घरातील कुटुंबाकडून भाकरी करून देण्याची परंपरा आजही टिकून आहे. लोकवर्गणीतून सहा डेक आमटी केली जाते. दिंडी नियोजनासाठी गावातील सर्व  तरुण मंडळे, जिएचव्ही कंपनी, यासह ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

तालुका पोलीस स्टेशनचा कडेकोट बंदोबस्त -  नगर तालुका पोलीस ठाण्याचे स. पो. नि. शिशिरकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला.

प्रशासकीय यंत्रणा तळ ठोकून .
प्रांत सुधीर पाटील,  तहसीलदार संजय शिंदे, गट विकास अधिकारी श्रीकांत खरात, यांच्या मार्गदर्शनाखाली सर्कल  साळवे वैशाली, तलाठी एम. पी. शेलार, विजू नाईक, ग्रामसेवक आर. व्ही कराळे यांच्यासह आरोग्य खते, कृषीखात्याचे अधिकारी कर्मचारी सकाळपासून तळ ठोकून होते.

No comments:

Post a Comment