नगर शहरात कोयत्याचा धाक दाखवून लुटणारा सराईत गुन्हेगार जेरबंद. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, June 2, 2023

नगर शहरात कोयत्याचा धाक दाखवून लुटणारा सराईत गुन्हेगार जेरबंद.

 नगर शहरात कोयत्याचा धाक दाखवून लुटणारा सराईत गुन्हेगार जेरबंद.


अहमदनगर -
कोयत्याचा धाक दाखवून पान टपरी चालकाला लुटणार्‍या सराईत गुन्हेगाराला एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले आहे. विशेष म्हणजे तो हातात तलवार घेवून परिसरात दहशत निर्माण करत असताना पोलिसांनी त्याला पकडले आहे.
शुभम उर्फ छब्या रवींद्र गायकवाड (वय २०, रा.फोर्जिंग कॉलनी, वडगाव गुप्ता शिवार, ता.नगर) असे या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. २९ मे रोजी नगर-मनमाड महामार्गावर चेतना कॉलनी (नवनागापूर) येथील पान टपरी चालक नितीन सुधाकर गायकवाड याला दोघा जणांनी हातात कोयता व गुप्ती घेऊन येत या हत्यारांचा धाक दाखवून त्याच्या टपरीतील रोकड बळजबरीने लुटून नेली होती. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना गुरुवारी (दि.१) सायंकाळी ७ च्या सुमारास दूध डेअरी चौका जवळील दत्त मंदिर परिसरात एक इसम हातात तलवार घेवून फिरत आहे व परिसरात दहशत निर्माण करत आहे, अशी माहिती एमआयडीसीचे स.पो.नि. राजेंद्र सानप यांना मिळाली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक योगेश चाहेर, राजेंद्र गायकवाड, पो.कॉ. सचिन हरदास, किशोर जाधव, सुरज देशमुख यांच्या पथकाने दूध डेअरी चौक परिसरात जावून आरोपी शुभम गायकवाड यास शिताफीने पकडले. त्याच्याकडून ११० से.मी. लांबीची तलवार जप्त करण्यात आली. 
याबाबत पो.कॉ. सुरेश सानप यांच्या फिर्यादीवरुन त्याच्यावर आर्म अ‍ॅक्ट ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पकडलेल्या आरोपीकडे कसून चौकशी केल्यानंतर त्याने कोयत्याचा धाक दाखवून पान टपरी चालकाला लुटल्याची कबुली दिली व लुटीतील २ हजार रुपयांची रोकड काढून दिली असल्याचे स.पो.नि. राजेंद्र सानप यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment