डंपरची दुचाकीला धडक; पोलीस कर्मचार्‍याच्या मुलाचा मृत्यू. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, June 2, 2023

डंपरची दुचाकीला धडक; पोलीस कर्मचार्‍याच्या मुलाचा मृत्यू.

 डंपरची दुचाकीला धडक; पोलीस कर्मचार्‍याच्या मुलाचा मृत्यू.


मुंबई :
मुंबईच्या पूर्व द्रुतगती मार्गावरील सुमन नगर सर्कल येथे बुधवारी रात्री भरधाव वेगात आलेल्या डंपरने एका दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकी चालवत असलेल्या चालकाचा मृत्यू झाला.
मृत व्यक्तीचे नाव सूरज पाटील असून त्याचे वडील पोलीस दलात कार्यरत आहेत. या अपघातामुळे पूर्व द्रुतगती मार्गावर बुधवारी बराच वेळ वाहतूक कोंडी झाली होती. या अपघातात दुचाकीस्वार सूरज पाटीलचा मृत्यू झाला.बुधवारी रात्री 10 च्या सुमारास सूरड दुचाकीवरून शीव येथून नवी मुंबईच्या दिशेने जात होता. याच वेळी सुमन नगर सर्कल परिसरातील शाहीर अण्णाभाऊ साठे उड्डाणपुलाखाली त्याच्या दुचाकीला एका डंपरने पाठीमागून जोरदार धडक दिली.
या अपघातात तो गंभीर जखमी झाला. काही स्थानिक रहिवाशांनी त्याला रस्त्याच्या बाजूला घेतले आणि रुग्णवाहिकेसाठी मोबाइलवरून संपर्क साधला. मात्र अर्धा तास उलटून गेल्यानंतरही रुग्णवाहिका न आल्याने अखेर त्याला पोलिसांच्या गाडीतून रुग्णालयात आणण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

No comments:

Post a Comment