आ.जगताप म्हणाले..मी लोकसभा निवडणूक लढवलेली आहे मात्र त्यावेळी… - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, May 31, 2023

आ.जगताप म्हणाले..मी लोकसभा निवडणूक लढवलेली आहे मात्र त्यावेळी…

आ.जगताप म्हणाले..मी लोकसभा निवडणूक लढवलेली आहे मात्र त्यावेळी…
अहमदनगर - लोकसभा निवडणुकाबाबत बोलतांना आ. संग्राम जगताप म्हणाले, पक्षाने लोकसभेसाठी सर्वसमावेशक उमेदवार द्यावा. मी मागील वेळेस निवडणूक लढवलेली आहे. मात्र त्यावेळी मला वेळ कमी मिळाला. त्या निवडणूकीनंतर आमच्याबाबत वेगळे चित्र निर्माण करण्यात येत आहे. नगरच्या उड्डाणपूल जमिन अधिगृहणासाठी अजित पवार यांनी निधी दिला होता. यामुळे उड्डणपुलाच्या कार्यक्रमाला जावे लागले. मात्र त्यावरून जगताप भाजपसोबत जात असल्याचे चित्र रंगवण्यात आले. अनेकजण राष्ट्रवादीला सोडून गेले. मात्र, जगताप आजही राष्ट्रवादीसोबत आहेत, अशी आठवण त्यांनी करून दिली. तसेच आगामी निवडणुकीसाठी सर्वसमावेशक उमेदवार दिल्यास पक्षाला फायदा होईल, असे आ.जगताप यांनी मत मांडले.

No comments:

Post a Comment