अहमदनगर जिल्ह्यांतील महिला मंडलाधिकाऱ्यांसह एक जण ‘एसीबीच्या’जाळ्यात. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, May 31, 2023

अहमदनगर जिल्ह्यांतील महिला मंडलाधिकाऱ्यांसह एक जण ‘एसीबीच्या’जाळ्यात.

अहमदनगर जिल्ह्यांतील; महिला मंडलाधिकाऱ्यांसह एक जण ‘एसीबीच्या’जाळ्यात..
अहमदनगर: श्रीरामपुर तालुक्यातील आरोपी लोकसेविका सारिका भास्कर वांढेकर, वय – ४१ वर्ष, मंडळाधिकारी, मंडळाधिकारी कार्यालय, बेलापूर बुग, ता. श्रीरामपूर, जि. अहमदनगर व आरोपी
बेलापूर बुद्रुक येथील अलीकडेच मंडलाधिकारी या पदावर रुजू झालेल्या महिला अधिकार्‍यांला नगर येथील लाचलुचपत विभागाच्या पथकाने दोन हजार रुपयांची लाच घेताना आज रंगेहाथ पकडले आहे.
या संदर्भात अनेक छोटी मोठी कामे करतांना त्यांच्याकडून पैशांची मागणी केली जात असल्याच्या लोकांच्या वाढत्या तक्रारी होत्या. गावातील एका व्यक्तीला त्यांनी एका कामासाठी दोन हजार रुपयांची मागणी केली होती. त्यावरून संबंधित व्यक्तीने लांचलुचपत विभागाशी संपर्क साधुन तक्रार दिली होती. त्यावरून ही कारवाई करण्यात आली. घटनेनंतर अधिकारी या महिला अधिकार्‍याला घेऊन शहरातील शासकीय विश्रामगृहात घेऊन गेले असुन तेथे पुढील कार्यवाही सुरु असल्याचे समजते.दरम्यान या घटनेनंतर अशा कामी मध्यस्ती करणार्‍यांचे धाबे दणाणले असुन त्यांची प्रचंड धावपळ सुरु असल्याचे दिसत आहे.

No comments:

Post a Comment