धारदार कोयत्याचा धाक दाखवून लुटमार करुन फरार झालेले दोन आरोपी कोतवाली पोलीसांकडून जेरबंद. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, May 24, 2023

धारदार कोयत्याचा धाक दाखवून लुटमार करुन फरार झालेले दोन आरोपी कोतवाली पोलीसांकडून जेरबंद.

धारदार कोयत्याचा धाक दाखवून लुटमार करुन फरार झालेले दोन आरोपी कोतवाली पोलीसांकडून जेरबंद.

३ दिवसांची पोलीस कोठडी..

अहमदनगर - दि.११/०५/२०२३ रोजी रात्री ०८/४५ वाजण्याच्या सुमारास सुरज सुनिल नायकवाडी वय १७ वर्ष धंदा- शिक्षण, रा. शिंदेगल्ली, माळीवाडा, अहमदनगर हा त्याचा मित्र. गणेश शंकर बहिरट  याचे सोबत त्यांचे कडील अॅक्सेस मोपेड गाडीवरुन केडगाव  येथून गायकेमळा आगरकरमळ्या मार्गे अहमदनगर शहराकडे येत असताना त्यांचे अॅक्सेस गाडीच्या मागुन एका शाईन मोटार सायकलवरुन दोन अनोळखी इसमांनी येवून त्यांचे गाडीस धक्का मारून अपघातात झालेले गाडीचे नुकसान भरून देतो असे सांगुन त्यांना काही अंतरावर सोबत घेवुन जावुन त्यांचे गळ्याला धारदार कोयता लावून फिर्यादीच्या हातातील सोन्याच्या दोन अंगठया बळजबरीने काढुन घेवुन तेथून पळुन गेले आहेत. वगैरे 'मजकुरच्या फिर्यादी वरुन कोतवाली पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. । ४६५ / २०२३ भा.द.वि. कलम ३९२,४२७,२७९,३४ प्रमाणे गुन्हा रेजि दाखल करण्यात आला होता.

दर गुन्हयाचा तपास करत असतांना कोतवाली पोलीसांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सदर गुन्हयात फरार आरोपी नामे १) मंगेश कांबळे व २) बाबा कावळे दोन्ही रा. केडगांव अहमदनगर हे हळदीच्या समारंभाकरिता केडगांव येथे येणार असल्याचे गुप्त बातमी मिळाल्याने गुन्हे शोध पथकातील अंमलदार यांनी केडगांव येथे जावुन सापळा लावून खात्री करून ताब्यात घेवून त्यांना त्यांची नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांची नावे १) मंगेश कालीदत्त कांबळे वय १९ वर्षे रा माधवनगर केडगांव अहमदनगर २) लक्ष्मीकांत उर्फ बाबा प्रकाश कावळे वय २४ वर्षे रा. अयोध्यानगर, केडगांव अहमदनगर असे असल्याचे सांगीतले त्यांचेकडे गुन्हयाचे अनुषंधाने चौकशी करता त्यांनी गुन्हा केल्याचे कबुल केले असुन त्यांना सदर गुन्हयात अटक करुन मा न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने त्यांना ३ दिवसांची कोठडी दिली आहे. तरी सदर गुन्हयाचा अधिक तपास पोसई मनोज महाजन हे करत आहेत.

सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे , उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे, परि.पोलीस उपाधिक्षक अरुण पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोसई मनोज कचरे, पोसई मनोज महाजन, पोलीस अंमलदार तनवीर शेख,  गणेश धोत्रे, योगेश भिंगारदिवे, अब्दुलकादर इनामदार, योगेश खामकर, संदिप थोरात,  अमोल गाडे, याकुब सय्यद, सुजय हिवाळे, कैलास शिरसाठ, सोमनाथ राऊत, सागर मिसाळ, मोबाईल सेलचे नितीन शिंदे यांच्या पथकाने केली आहे.

No comments:

Post a Comment