ठाणगे मळा, आदर्श कॉलनी येथील कॉक्रीटीकरण कामाचा शुभारंभ. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, May 24, 2023

ठाणगे मळा, आदर्श कॉलनी येथील कॉक्रीटीकरण कामाचा शुभारंभ.

 सर्वांचा जिव्हाळ्याचा पाणी प्रश्न लवकरच मार्गी लागणार महापौर रोहिणी शेंडगे

ठाणगे मळाआदर्श कॉलनी येथील कॉक्रीटीकरण कामाचा शुभारंभ.


नगर - नागरिकांना सर्वप्रकारच्या सोयी-सुविधा देण्यासाठी विविध निधीच्या माध्यमातून नगर शहरात विविध कामे मार्गी लावण्यात आली आहेत. त्याचबरोबर प्रत्येक प्रभागातील नागरिकांच्या मुलभूत गरजापूर्ण करण्यात येत आहे. अमृत योजनेंतर्गत ड्रेनेज लाईन, पिण्याच्या पाण्याची लाईन व रस्ते अशी कामे प्रत्येक भागात झाली आहेत. या योजनेंतर्गत अमृत योजनेची कामे पुर्णत्वास आल्याने आता सर्वांचा जिव्हाळ्याचा प्रश्न असलेला पाण्याचा प्रश्नही काही दिवसात मार्गी लागणार आहे. त्याबाबतच्या सर्व चाचण्या पूर्ण झाल्या असून, प्रत्येक भागाला पूर्णदाबाने पाणी पुरवठा होणार आहे. नागरिकांना दिलेल्या आश्वसनांची पूर्तता होत आहे, याचे मोठे समाधान आहे. नगर शहराला एक विकसित शहर म्हणून डेव्हलप करण्याचा प्रयत्न केला आहे. कल्याण रोड परिसरातील नागरिकांसाठी विशेष निधीच्या माध्यमातून येथील बहुतांश कामे मार्गी लावली आहेत. त्यासाठी नगरसेवकांचा कायम पाठपुरावा असतो. पुढील काळातही उर्वरित कामे केली जातील, अशी ग्वाही महापौर रोहिणी शेंडगे यांनी दिली.

ठाणगे मळा, आदर्श कॉलनी येथे मनपा महिला बाल कल्याण समितीच्या सभापती पुष्पाताई बोरुडे, नगरसेवक सचिन शिंदे, शाम नळकांडे यांच्या प्रयत्नातून व महापौर रोहिणी शेंडगे यांच्या निधीतून कॉक्रीटीकरण कामाचा शुभारंभ महापौर रोहिणी शेंडगे यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी स्थायी समिती सभापती गणेश कवडे, माजी विरोधीपक्ष नेते संजय शेंडगे, माजी उपमहापौर अनिल बोरुडे, राजु कवडे, संतोष शिंदे, दत्तू खैरे, दिपक लांडे, उमेश झुरळे, दिलीप अस्मर, भाऊसाहेब शिंदे, दिपक वांढेकर, शाम जाधव, बबन दळवी, शाम डवरे, लक्ष्मण कुलकर्णी, संतोष दाणे, राजेंद्र खेडकर, सनी शिंदे, गणेश पारखे, अनिकेत सुर्यवंशी, राजू चव्हाण, नंदू दाणे, अक्षय पवार, भारती चव्हाण, मनिषा लांडे, निर्मला सूर्यवंशी, रंजना शिंदे, साधना खैरे, मंदा वांढेकर, ताराबाई कवडे, अपर्णा वाव्हाळ, लिला पवळ, तुळसाबाई जाधव, प्रतिभा झुरळे, हिराबाई शिंदे आदि उपस्थित होते.
याप्रसंगी नगरसेवक शाम नळकांडे म्हणाले, प्रभागातील सर्व भागातील प्रलंबित कामे गेल्या काही दिवसांपासून पुर्ण केली जात आहे. महापौर रोहिणीताई शेंडगे यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध होत असल्याने या भागात चांगली कामे झाली आहेत. विशेषत: पिण्याचा पाण्याच्या प्रश्नांसाठी मनपाच्या सर्वसाधारण सभेत आवाज उठवला आहे. त्यामुळे हाही प्रश्न काही दिवसात मार्गी लागेल, असे सांगितले.
यावेळी सचिन शिंदे म्हणाले, नागरिकांना सर्व सुविधा पुरविण्यासाठी आम्ही कटीबद्ध असून, टप्पटप्प्याने सर्व भागातील कामे प्राधान्याने करण्यात येत आहे. नागरिकांनीही आपल्या भागातील कामांसाठी पाठपुरावा करावा. वाढत्या वसाहतींना मुलभूत सुविधा देण्याचा प्रयत्न विकास कामांतून केला जात असल्याचे सांगितले.
याप्रसंगी स्थायी समिती सभापती गणेश कवडे यांनीही स्थायी समितीच्या माध्यमातून या प्रभागातील विकास कामांसाठी स्वत: प्रयत्नशिल राहू, असे सांगितले. यावेळी माजी उपमहापौर अनिल बोरुडे, संजय शेंडगे आदिंनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजु कवडे यांनी केले तर आभार संतोष शिंदे यांनी मानले.

No comments:

Post a Comment