या माजी महापौरांचे दुःखद निधन. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, May 9, 2023

या माजी महापौरांचे दुःखद निधन.

या माजी महापौरांचे दुःखद निधन.
मुंबई - माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचं निधन मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचं निधन झालं आहे. वयाच्या ६३ व्या वर्षी त्यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाल्याची माहिती मिळाली आहे. विश्वनाथ महाडेश्वर यांच्या निधनाने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.
चार दिवसांपूर्वी ते गावावरून परतले होते. रात्री खूप अस्वस्थ वाटू लागलं आणि प्रकृती बिघडली. त्यांना तातडीने व्ही एन देसाई रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. तिथे उपचारादरम्यान त्यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाल्याची माहिती मिळाली आहे.
त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी सांताक्रूझ पूर्व इथे राजे संभाजी विद्यालयात दुपारी 2 वाजता ठेवण्यात येईल. दुपारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अंत्यदर्शन घेतील. त्यानंतर संध्याकाळी 4 वाजता अंत्ययात्रा निघणार आहे.

No comments:

Post a Comment