बनावट नावाने मागणी करून लाखों रुपयांची शीतपेय परस्पर पसार करणारा आरोपी पारनेर पोलिसांकडून जेरबंद. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, May 10, 2023

बनावट नावाने मागणी करून लाखों रुपयांची शीतपेय परस्पर पसार करणारा आरोपी पारनेर पोलिसांकडून जेरबंद.

बनावट नावाने मागणी करून लाखों रुपयांची शीतपेय परस्पर पसार करणारा आरोपी पारनेर पोलिसांकडून जेरबंद.
पारनेर - पारनेर येथील वैभव प्रदीप औटी (वय २२ वर्ष) धंदा चालक रा.कोर्ट गल्ली ता. पारनेर हे चालक म्हणून काम करतात फिर्यादी मालवाहतूक करीत असतात दि  3  रोजी त्यांना दिपक औटी रा. पारनेर यांनी बोलावून सांगितले की महावीर सुपर मार्केट टाकळी ढोकेश्वर येथील शितपेयची ऑर्डर आहे ते मागणीप्रमाणे लोड करून टाकळी येथे डिलिव्हरी करून या. त्यावेळी त्यांनी वेगवेगळ्या कंपनीचे १,३२,४००  लोड केले व टाकळी  येथे पाठवून दिला यातील आरोपीने  यांनी शासकीय रुग्णालय टाकळी ढोकेश्वर येथे आधीच पिकपअप वाहन आणून सुदर्शन किराणा स्टोअर्स समोर येऊन थांबले होते. आरोपी यांनी फिर्यादीच्या टेम्पो अडवून  महावीर सुपर शॉप चे मालकाने अर्धा माल पिकअप  मध्ये खाली करण्यास सांगितले आहे व उर्वरित सुपर शॉप मध्ये जाऊन खाली करा व पैसे महावीर शॉप कडून घेऊन टाका असे सांगितले फिर्यादी यांनी विश्वास ठेवून त्यांना टेम्पो मधून काढून दिला महावीर सुपर शॉप येथे जाऊन अर्धा माल कुठे खाली करू असे विचारल्यावर तेथील  चेतन भंडारी यांनी मालाची मागणी केली नसल्याचे सांगितले तेव्हा यांना फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले वैभव औटी यांनी घडलेली सर्व हकीकत यांचे मालक  दीपक औटी यांना दिली. दिपक औटी यांना मागणी झालेल्या मोबाईल क्रमांकावर फोन केला असता तर स्विचऑफ आला त्यानंतर फिर्यादी यांनी टाकळी ढोकेश्वर पोलीस दूरशेत्र येथे फिर्याद दिल्याने गु. र.क्र.४१३ भा. क ४२०,४०६, ३४ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला सदर गुन्ह्याचे तपासात पोलीस अधीक्षक, पोलीस अधीक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील ,पोलीस निरीक्षक पारनेर पोलीस स्टेशन यांचे आदेशनुसार तपास सुरू करण्यात आला .त्यामध्ये घटनास्थळाची आजूबाजूचे सीसीटीव्ही कॅमेरे चेक करण्यात आले .कॉल डिटेल्स घेण्यात आली व आरोपी यांचे टोल नाका येथे सीसीटीव्ही चेक केले परंतु आरोपी यांनी वाहन टोलनाक्यावर न नेता आड मार्गाने नेला असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर गोपनीय साक्षीदार व तांत्रिक तपास करून आरोपी शेवगाव तालुक्यातील असल्याचे निष्पन्न झाले व त्याचे नाव दिपक गणेश गुगळे असून वडूले गावचा असल्याचे निष्पन्न झाले. त्याच मिरी माका गावाच्या शिवारात अंधारात पाठलाग करून ताब्यात घेतले. सुरुवातीस त्यांनी उत्तरे दिली परंतु नंतर त्याने गुन्ह्यात वापरलेली पिकअप गाडी एकूण २लाख ३८ हजार ९० हजार रुपयांचा मुद्देमाल काढून दिला व उर्वरित मुद्देमाल त्यांचे साक्षीदार ऋषिकेश वंजारी, गंधेवाडी ता. शेवगाव .ओंकार गुंजाळ ,पूर्ण नाव माहित नाही जयेश खरमाळे भांडगाव ता.पारनेर यांना विकण्याचे सांगीतले. सदरची उल्लेखनीय कामगिरी  पोलीस अधीक्षक राकेश ओला ,अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे ,उपविभागीय अधिकारी नगर ग्रामीण भाग अजित पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांचे सूचने नुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय ठाकूर ,पोलीस कॉन्स्टेबल संदीप गायकवाड ,पोलीस शिपाई मच्छिंद्र खेमनर, रवींद्र माने यांनी केला आहे.

No comments:

Post a Comment