राष्ट्रवादीकडून लोकसभेच्या उमेदवार निश्चितीची तयारी; नगरमधुन ‘ही’ नावे आघाडीवर. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, May 31, 2023

राष्ट्रवादीकडून लोकसभेच्या उमेदवार निश्चितीची तयारी; नगरमधुन ‘ही’ नावे आघाडीवर.

 राष्ट्रवादीकडून लोकसभेच्या उमेदवार निश्चितीची तयारी; नगरमधुन ‘ही’ नावे आघाडीवर.


अहमदनगर -
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने चाचपणी सुरू केली आहे. मुंबईतील पक्ष कार्यालयात झालेल्या बैठकीत नगरसाठी उमेदवार निश्चितीची मागणी करण्यात आली. उमेदवारीसाठी आमदार नीलेश लंके, माजी आमदार अरुण जगताप, दादा कळमकर, राजेंद्र फाळके यांच्या नावांवर चर्चा झाली.
मागील निवडणुकीत अहमदनगर दक्षिण मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांचा भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी पराभव केला होता. आता ही जागा ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रवादीकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. आगामी लोकसभेसाठी राष्ट्रवादीकडून कोणत्या उमेदवाराला संधी दिली जाईल, याबाबत तर्क-वितर्क लढवले जात आहेत.
मंगळवारी राष्ट्रवादीच्या मुंबई येथील पक्ष कार्यालयात सकाळी अकराच्या सुमारास झालेल्या बैठकीत उमेदवारांबाबत चर्चा झाली. या वेळी पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार छगन भुजबळ, खासदार सुनील तटकरे, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार हसन मुश्रीफ, पक्षनिरीक्षक माजी महापौर अंकुश काकडे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, आमदार प्राजक्त तनपुरे, आमदार संग्राम जगताप, माजी आमदार दादा कळमकर, माजी आमदार राहुल जगताप, माजी आमदार चंद्रशेखर घुले, घनशाम शेलार, अंबादास गारुडकर, राजेंद्र कोठारी उपस्थित होते. नगर दक्षिणेचा उमेदवार लवकर ठरवावा, अशी मागणी नगरच्या पदाधिकारी व लोकप्रतिनिधींनी बैठकीत मांडली. त्यानुसार आमदार नीलेश लंके यांचे नाव आघाडीवर होते. त्याचबरोबर पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, माजी आमदार अरुण जगताप, दादा कळमकर, घनशाम शेलार यांच्या नावाची चर्चा झाली.

No comments:

Post a Comment