मोठी दुर्घटना: गंगा नदीत बोट उलटली 4 महिलांचा मृत्यू. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, May 22, 2023

मोठी दुर्घटना: गंगा नदीत बोट उलटली 4 महिलांचा मृत्यू.

 मोठी दुर्घटना: गंगा नदीत बोट उलटली 4 महिलांचा मृत्यू.


बलिया -
 उत्तर प्रदेशमधील बलिया जिल्‍ह्यात आज सकाळी गंगा नदीत बोट उलटल्याने मोठी दुर्घटना घडली. या अपघातात चार महिलांचा बुडून मृत्‍यू झाला असून २५ हून अधिक जण बेपत्ता आहेत. अपघातावेळी बोटीत ५० हून अधिक जण हाेते, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे.

सोमवारी मुंडन संस्कार कार्यक्रमासाठी ५० जण बाेटीतून जात हाेते. मालदेपूर मोदजवळ हैबतपूर घाटात गंगा नदीत बोट उलटली. प्रशासनासह स्थानिक लोकांनी तत्‍काळ बचावकार्य सुरु केले असून येथील पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. सीएमएस जिल्हा रुग्णालयाच्‍या सूत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार या दुर्घटनेत चार महिलांचा मृत्यू झाला आहे. युध्दपातळीवर ‍‍बचावकार्य सुरू आहे.

No comments:

Post a Comment