महिला निर्मित वस्तूच्या विक्रीचे प्रदर्शन. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, March 20, 2023

महिला निर्मित वस्तूच्या विक्रीचे प्रदर्शन.

 महिला निर्मित वस्तूच्या विक्रीचे प्रदर्शन.


कर्जत -
वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट व एच एस बी सी अंतर्गत महिला उद्योजकता विकास व रोजगारांच्या संधींना प्रोत्साहन देऊन उत्पन्नात वाढ या प्रकल्पा अंतर्गत दिनांक 19 व 20 मार्च 2023 दोन दिवसाचे महिलांनी तयार केलेल्या वस्तूच्या विक्रीचे प्रदर्शन कर्जत येथे भरवीण्यात आले आहे.
या प्रदर्शनामध्ये कर्जत तालुक्यातील महिला स्वयंसहायता गटांनी उत्पादित केलेल्या वस्तू व खाद्यपदार्थ यांचे प्रदर्शन व विक्री करण्यात येत आहे. सदरच्या प्रदर्शनाचे उद्घाटन कर्जत नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सौ उषा अक्षय राऊत, उपनगराध्यक्षा सौ रोहिणी सचिन घुले यांच्या हस्ते करण्यात आले.  उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समितीच्या माजी सभापती सौ मीनाक्षी बाळासाहेब साळुंखे, मा. नगरसेविका मनिषा सचिन सोनमाळी तसेच माजी जि. प. सदस्य प्रवीण घुले, नगरसेवक अमृत काळदाते, माजी ग्रा.पं सदस्य अनिल गदादे व वॉटर शेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट च्या सहा. व्यवस्थापक शालू गायकवाड, सतीश सोनवणे, शुभम वाघ, सत्यवान भोगे, अजित जगताप, पोपट गावडे, वंदना गंगावणे आदी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. ग्रामीण भागातल्या महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे व खाद्यपदार्थांना बाजारपेठ उपलब्ध करून दिल्याबद्दल संस्थेचे नगराध्यक्षांनी आभार व्यक्त करून सर्व कर्जत वासियांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आव्हान केले.

No comments:

Post a Comment