पारनेर पोलिसांनी वाळू तस्करांच्या मुसक्या आवळल्या. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, March 20, 2023

पारनेर पोलिसांनी वाळू तस्करांच्या मुसक्या आवळल्या.

 पारनेर पोलिस निरीक्षकांच्या आदेशाने कारवाई....

पारनेर पोलिसांनी वाळू तस्करांच्या मुसक्या आवळल्या.


पारनेर -
पारनेर पोलिसांनी अवैधरीत्या वाळूची चोरटी वाहतूक करणारा ट्रेक्टर सह एक आरोपी पारनेर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. पारनेर तालुक्यातील पोखरी वारणवाडी शिवारात पोलिसांनी सापळा रचून कारवाई करत तिन लाख चार हजार किमतीचा मुदेमाल हस्तगत केला आहे.
सविस्तर माहिती अशी की, पारनेर पोलिसांचे एक पथक पहाटे चार वाजताचे सुमारास भीमाबाई महादू पवार रा. फरतारे वस्तीवर त्यांच्या घरी चोरी झाल्याने पोलीस पथक पोखरी गावात पेट्रोलिंग करत असताना पारनेर पोलिस स्टेशनचे पो. नि. संभाजी गायकवाड याना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की एक लाल रंगाचा ट्रॅक्टर अवैध रित्या वाळूची चोरटी वाहतूक करत आहे. तो आता पोखरी गावाकडून वारणवाडी गावाकडे जात आहे. अशी गुप्त माहिती पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना मिळाली होती. त्यानी तात्काळ पेट्रोलिंग करत असलेल्या पथकास माहिती दिली. व कारवाई करण्याचा आदेश दिला. पोलीस हेड कॉन्स्टेबल भोसले वारणवाडी गावचे शिवारात हॉटेल रो हाऊस जवळ रोडवर सापळा लावून थांबले. त्यावेळी ठीक चार वाजून पंचेचाळीस वाजेचे सुमारास एक लाल रंगाचा ट्रॅक्टर पोलिसांना येताना दिसला त्यांनी तो थांबवला. त्यावरील चालकास नाव व गाव विचारले असता त्यांनी त्याचे नाव कैलास अनिल जाधव वय ३४ रा. पवळदरा पो. पोखरी ता. पारनेर असे सांगून ट्रॅक्टर काय आहे असे विचारल्यावर त्यानें वाळू असल्याचे सांगीतले. खात्री केली असता ट्रॅक्टर ची दोन चाकी ट्रॉलीचे हौदा मध्ये पूर्णपणे वाळू भरलेली असून अंदाजे एक ब्रास वाळू दिसून आली. वाळू वाहतूक परवाना त्याच्या कडे नव्हता. वाळू हि पवळदरा येथील नदी पात्रा तून भरल्याचे सांगीतले. मालकाचे नाव अंकुश भाऊ काशीद रा वारणवाडी असे सांगीतले. त्याच्या सांगण्या वरून मी वाहतूक करत आहे. व त्याचे मालकीचे ट्रॅक्टर मध्ये अंदाजे एक ब्रास वाळू अवैध रित्या भरून स्वताच्या आर्थिक फायद्या साठी मिळून आलेला आहे. पो. कों. कदम यांनी त्याच्या विरुद्ध भा द वी कलम ३७९,३४ पर्यावरण कायदा कलम ३/१५ नुसार कायदेशीर फिर्याद दाखल केली आहे. सदरची कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, ग्रामीण उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील, यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड  यांच्या आदेशाने करण्यात आली. पोलीस कर्मचारी बाबासाहेब भोसले, जालिंदर लोंढे, गाहिनीनाथ यादव, सुधीर खाडे, सत्यम शिंदे, अनिल रोकडे, रमेश वेताळ, होमगार्ड जाधव आदीच्या पथकाने कारवाई केली आहे.


No comments:

Post a Comment