आमदार संग्राम जगताप यांच्या पाठपुराव्याला यश. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, February 7, 2023

आमदार संग्राम जगताप यांच्या पाठपुराव्याला यश.

 आमदार संग्राम जगताप यांच्या पाठपुराव्याला यश.

तारकपूर ते राधाबाई काळे महाविद्यालय व नटराज हॉटेल ते एसटी वर्कशॉप पर्यंतचा रस्त्या कॉंक्रिटीकरण कामासाठी शासनाकडून १ कोटी ६६ लक्ष रुपयांचा निधी प्राप्त.


अहमदनगर :
शहर विकासाचे पन्नास वर्षांचे कायमस्वरूपीचे नियोजन करून विकास कामे सुरू केले आहे. विकास कामांचा निधी साठी शासन दरबारी पाठपुरावा सुरु असल्याने टप्प्याटप्प्याने विकास कामासाठी निधी प्राप्त होत आहे. जमिनी अंतरंगातील पिण्याच्या पाण्याच्या लाईन बंद पाईपलाईन गटार योजनांची कामे पूर्ण केल्यानंतर कायमस्वरूपीचे रस्त्यांची कामे हाती घेतली आहे. त्यानुसार शहरात मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामे सुरू आहेत रयत शिक्षण संस्थेचे राधाबाई काळे महाविद्यालयाकडे तारकपूर बस स्थानकापासून जाणाऱ्या रस्त्या कॉंक्रिटीकरणासाठी १ कोटी १६ लक्ष रुपयांचा निधी शासनाकडून प्राप्त झाला आहे. तसेच नटराज हॉटेल चे एसटी वर्कशॉप पर्यंतच्या रस्त्या कॉंक्रिटीकरणासाठी शासनाकडून ५० लक्ष रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. राधाबाई काळे महाविद्यालयाचा रस्ता अनेक वर्षापासून प्रलंबित होता या रस्त्यांवरून मोठ्या प्रमाणात जिल्हाभरातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी ये जा करत असतात खराब रस्त्यांमुळे विद्यार्थिनींना वाहतुकीसाठी मोठी कसरत करावी लागत आहे हा कायमस्वरूपीचा प्रश्न मार्गी लावने गरजेचा होता त्याच बरोबर एसटी वर्कशॉप ते नटराज हॉटेलचा हा रस्ता औरंगाबाद महामार्गाला जोडणारा रस्ता असल्यामुळे या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात दळणवळण होत आहे. नगर शहरातील नागरिकांचा सुखकर प्रवास व्हावा यासाठी रस्त्यांच्या कामासाठी शासन दरबारी पाठपुरावा सुरू असून जस-जसा निधी प्राप्त होईल तस-तसे शहरातील रस्त्यांची कामे मार्गी लागले जातील. राधाबाई काळे महाविद्यालय रस्ता व नटराज हॉटेल ते एसटी वर्कशॉप पर्यंतच्या रस्त्या काँक्रीट करण्यासाठी सुमारे १ कोटी ६६ लक्ष रुपयांचा निधी प्राप्त झाला असल्याची माहिती आ.संग्राम जगताप यांनी दिली

No comments:

Post a Comment