कृषी गंगा राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे पारनेरमध्ये उद्घाटन संपन्न. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, February 3, 2023

कृषी गंगा राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे पारनेरमध्ये उद्घाटन संपन्न.

 कृषी गंगा राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे पारनेरमध्ये उद्घाटन संपन्न.

कृषी प्रदर्शनात राज्यभरातील 130 मोठे स्टॉल सहभागी; राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचा शेतकर्‍यांनी लाभ घ्यावा, आ.लंकेंचे आवाहन !


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
पारनेर ः गेल्या अनेक महिन्यांपासून स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद पंचायत समिती व बाजार समिती महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक निर्णयबाबत  राज्य सरकार चालढकल करत असुन कोणत्याही क्षणी हे सरकार कोसळण्याची शक्यता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी पारनेर येथील कृषगंगा प्रदर्शना दरम्यान पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केली आहे.तर दुसरीकडे नुकताच झालेल्या निवडणुकीच्या निकालानंतर स्थानिक स्वराज्य संस्था शिंदे - फडणवीस सरकार निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी घाबरत असल्याचा हल्लाबोल आमदार निलेश लंके यांनी पारनेर येथे केला आहे.तर दुसरीकडे मी एक सर्व सामान्य कार्यकर्ता असल्याने लोकसभा निवडणुकीत बाबत शरद पवार हे निर्णय घेतील परंतु माझा लोकसभेबाबत विचार करतील की नाही याबाबत प्रश्नाला आमदार निलेश लंके यांनी बगल दिली आहे.
विचार छत्रपतींचा सन्मान बळीराजाचाहे बोधवाक्य घेवून पारनेर बाजार समितीजवळील प्रांगणात  या चौथ्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात राज्यभरातील 130 मोठे स्टॉल सहभागी झाले होते
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभाकर शेठ कवाद हे होते यावेळी तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे, आशोकराव सावंत , जिल्हा उपप्रमुख अर्जुन भालेकर , अशोक कटारिया राजेंद्र चौधरी नगराध्यक्ष विजय औटी उपनगराध्यक्ष सौ सुरेखा भालेकर  कारभारी पोटघन माजी सभापती सुदाम पवार चेअरमन शिवाजी व्यवहारे दिपक लंके , ज्ञानदेव लंके , गुरूदत्त पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष बा.ठ.झावरे बापूसाहेब शिर्के तालुकाध्यक्ष संभाजी रोहकले खंडु भुकन बाळासाहेब खिलारी मारूती शेठ रेपाळे दादा शिंदे अ‍ॅड राहुल झावरे जिल्हा उपाध्यक्ष रा.या औटी श्रीकांत चौरे , डॉ बाळासाहेब कावरे बबलु रोहकले तालुका कृषी अधिकारी विलास गायकवाड भागुजी दादा झावरे पोपट साळुंके महिला आघाडीच्या सुवर्णा धाडगे तालुकाध्यक्ष पुनम मुंगसे जिल्हाध्यक्षा राजेश्वरी कोठावळे उमाताई बोरुडे राजश्री खामकर वैजयंता मते हिमानी नगरे बाळासाहेब नगरे नंदकुमार देशमुख शिवाजी वराळ उद्योजक कैलास गाडिलकर विक्रम कळमकर अजय शेठ लामखडे प्रा.संजय लाकुडझोडे करमाळा जिल्हा परिषद सदस्य संतोष वारे सोमनाथ वरखडे , सुनिल कोकरे , हरिभाऊ जाधव  नगरसेवक सुभाष शिंदे , भुषण शेलार , डॉ .सचिन औटी नाना पाटील लंके राजेंद्र चेडे , अक्षय चेडे बंडू गायकवाड रमीज राजे संदीप सालके बाळा ब्राम्हणे व्यवस्थापक बंडू पाचपुते , गणेश जठार भाऊसाहेब रासकर सरपंच सचिन पठारे सरपंच प्रकाश राठोड  शिवाजी जाधव बाळासाहेब पुंडे सचिन साखला दौलत गांगड सत्यम निमसे अरूणराव पवार जगदीश गागरे संदिप भाऊ चौधरी  यांच्या सह ग्रामस्थ व शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत मोढवे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment