या कारणामुळे ‘उद्या’ शहरासह उपनगराचा पाणीपुरवठा विस्कळीत. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, February 3, 2023

या कारणामुळे ‘उद्या’ शहरासह उपनगराचा पाणीपुरवठा विस्कळीत.

 या कारणामुळे ‘उद्या’ शहरासह उपनगराचा पाणीपुरवठा विस्कळीत.


अहमदनगर :
वीज कंपनरकडून मुळा धरणावरील वाहिनीची दुरुस्ती कामासाठी उद्या(दि.४) सकाळी ११ ते ५ वाजेपर्यंत शटडाउन घेण्यात येणार आहे. त्यामुळे काळात मुळानगर, विळद येथून होणारा पाण्याचा उपसा बंद राहणार असल्याने शहराचा पाणीपुरवठा एक दिवस उशिरा होणार आहे.
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरणकंपनीकडून मुळा डॅम वाहिनीचे फिडर शिफ्टींग / दुरुस्ती कामासाठी शनिवारी सकाळी ११ ते ५ वाजेपर्यंत शटडाउन घेण्यात येणार आहे. तसेच या काळात अहमदनगर मनपामार्फत राबविण्यात येत असलेल्या 'अमृत' योजनेची महत्वाची कामे कार्यरत शहर पाणीपुरवठा योजनेवरील महत्वाची दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहे. दरम्यान काळात मुळानगर, विळद येथून होणारा पाण्याचा उपसा बंद राहणार असल्याने शहर पाणी वितरणासाठीच्या टाक्या भरता येणार नाही. त्यामुळे शनिवार दि.४ रोजी बोल्हेगाव, नागापूर, सावेडी उपनगरातील गुलमोहर रोड, पाईपलाईन रोड, लक्ष्मीनगर, सुर्यनगर, निर्मलनगर, मुकुंदनगर तसेच सारसनगर, केडगाव,नगर-कल्याण रोडवरील शिवाजीनगर परिसर इ. भागास (सकाळी ११.०० नंतरच्या पाणी वाटपाच्या भागास) पाणीपुरवठा होवू शकणार नाही. सदरचा पाणीपुरवठा हा रविवार दि. ५ रोजी करण्यात येईल. तसेच रविवार दि.५ रोजी रोटेशननुसार पाणी बाटपाच्या शहराच्या मध्यवर्ती भागास म्हणजेच सिध्दार्थ नगर, लालटाकी, तोफखाना, दिल्लीगेट, नालेगांब, चितळे रोड, आनंदीबाजार,कापडबाजार, ख्रिस्त गल्ली, पंचपीर चावडी, जुने मनपा कार्यालय परिसर, माळीवाडा, बालिकाश्रम रोड परिसर, सावेडी, स्टेशन परिसर, आगरकर मळा, विनायक नगर, कायनेटीक चौक परिसर इ. भागात महानगरपालिकेमाफत पाणीपुरवठा करण्यात येणार नाही, या भागातील पाणीपुरवठा हा रविवार ऐवजी सोमवार दि.६ रोजी करण्यात येईल.सोमवार दि.६रोजी पाणीपुरवठा होवू घातलेल्या मंगलगेट, रामचंद्रखुंट, झेडींगेट, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, दाळमंडई, काळुबागवान गल्ली, धरती चौक, बंगाल चौकी, माळीवाडा, कोठी या भागात व गुलमोहर रोड, प्रोफेसर कॉलनी परिसर, सिव्हील हडको, प्रेमदान हडको, म्युनिसिपल हडको इ. भागात पाणीपुरवठा होणार नसून तो मंगळवार दि.७ रोजी करण्यात येईल. शहरातील पाणीपुरवठा एक दिवस बंद करुन उपनगरात ज्या भागात जास्त दिवसाचे रोटेशन आलेले आहे अशा भागात पाणीपुरवठा करण्याचा महानगरपालिचा मानस आहे. तरी नागरीकांनी असलेल्या पाण्याचा वापर काटकसरीने करून महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन मनपाकडून करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment