महावितरणच्या संपाच्या पहिल्याच दिवशी.. या भागातील वीज मध्यरात्रीपासून गायब. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, January 4, 2023

महावितरणच्या संपाच्या पहिल्याच दिवशी.. या भागातील वीज मध्यरात्रीपासून गायब.

महावितरणच्या संपाच्या पहिल्याच दिवशी.. या भागातील वीज मध्यरात्रीपासून गायब.

नागरिकांचे अतोनात हाल.
अहमदनगर - महावितरणचे खासगीकरण होऊ नये म्हणून राज्यातील वीज कर्मचारी संपावर गेले आहेत. त्यामुळे राज्यातील अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाला आहे. मध्यरात्रीपासूनच वीज पुरवठा खंडित झाल्याने अनेक ग्राहक, नागरिक त्रस्त झाले आहेत. अनेक भागात हेच चित्रं सुरू आहे. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तीन दिवस हा संप सुरू राहणार असल्याचं म्हटले आहे. मात्र संपाच्या पहिल्याच दिवशी नागरिकांचे हाल होताना दिसत असून अजून दोन दिवस काढायचे कसे. असा प्रश्न राज्यातील नागरिकांना पडला आहे.
नगरमध्येही मध्यरात्री पासूनच वीज पुरवठा खंडित झाला आहे.‌थंडीचे दिवस असल्याने पंखे, कुलरची गरज नसली तरी पाण्याच्या मोटारी, मोबाईल चार्जिंगचे प्रश्न निर्माण झाले आहे.

No comments:

Post a Comment