अतिक्रमणाची तक्रार केल्याने सरपंचपद रद्द झालेल्या ...या सरपंच महिलेच्या पतीकडून तक्रारदारास जीवे मारण्याची धमकी. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Sunday, January 8, 2023

अतिक्रमणाची तक्रार केल्याने सरपंचपद रद्द झालेल्या ...या सरपंच महिलेच्या पतीकडून तक्रारदारास जीवे मारण्याची धमकी.

अतिक्रमणाची तक्रार केल्याने सरपंचपद रद्द झालेल्या ...या सरपंच महिलेच्या पतीकडून तक्रारदारास जीवे मारण्याची धमकी.
अहमदनगर - गावच्या महिला सरपंचाच्या कुटुंबीयांनी ग्रामपंचायतच्या जागेत अतिक्रमण करत घर बांधले असून या अतिक्रमणाची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी सरपंच पद रद्द केल्याच्या रागातून महिला सरपंचाच्या पतीने तक्रारदारास शिवीगाळ करत हात पाय तोडण्याची व कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना नगर तालुक्यातील गुंडेगाव येथे घडली. याबाबत दादासाहेब राजाराम जावळे (वय ४२, रा.गुंडेगाव, ता.नगर) यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 
सदर घटनेची हकीकत अशी की, फिर्यादी जावळे यांनी गावच्या महिला सरपंच मंगल संतोष सकट यांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी ग्रामपंचायतच्या जागेत अतिक्रमण करत घर बांधले असून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. या तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व साक्षी पुरावे पाहून महिला सरपंच मंगल सकट यांचे सरपंचपद रद्द केलेले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयाविरोधात सकट यांनी नाशिक विभागीय आयुक्तांकडे अपील केलेले आहे. या पार्श्वभूमीवर तक्रारदार जावळे हे घरासमोर बसलेले असताना सरपंच पती संतोष लिंबाजी सकट हे तेथे गेले व त्यांनी तक्रार केल्याचा राग मनात धरून जावळे यांना शिवीगाळ केली. तसेच नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयाकडे फिरकल्यास हात पाय तोडण्याची व कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे जावळे यांनी फिर्यादीत म्हंटले आहे.
या फिर्यादीवरून पोलिसांनी संतोष लिंबाजी सकट याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

No comments:

Post a Comment