चायना मांजा विक्रेत्यावर गुन्हा दाखल. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, January 10, 2023

चायना मांजा विक्रेत्यावर गुन्हा दाखल.

 चायना मांजा विक्रेत्यावर गुन्हा दाखल.

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, 68,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः महाराष्ट्र राज्यात विक्रीस बंदी असलेला व पक्षी, प्राणी व मानवी जिवीतास इजा करणारा प्लास्टीक, नायलॉनचा चायना मांजा विक्री करणार्‍या प्रथमेश राजु करपे (रा. वरवंडे गल्ली, माळीवाडा), चेतन कन्हैया चिपोळे (रा. जुना बाजार, हमालवाडा), जावेद कासम शेख (रा. माळीगल्ली, केडगांव) यांचेवर गुन्हे दाखल करण्यात आले असून करुन मोनाकिट, हिरोप्लस, मोनो काईट फायटर असे वेगवेगळ्या कंपनीचा 68,600/- (आडुसष्ठ हजार सहाशे) रुपये किंमतीचा 77 नग नायलॉन मांजा मिळुन आल्याने तो जप्त करण्यात आला आहे. प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, राकेश ओला साहेब, पोलीस अधिक्षक, अहमदनगर यांनी अनिल कटके, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना  चायना मांजा विक्री करणार्‍याइसमा विरुध्द कारवाई करणे बाबत आदेश दिले होते. नमुद आदेशान्वयेअनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सोपान गोरे, मनोहर शेजवळ, संदीप पवार, संदीप घोडके, देवेंद्र शेलार, शंकर चौधरी, रवि सोनटक्के, दिपक शिंदे, रविंद्र घुंगासे, सागर ससाणे, मयुर गायकवाड, कमलेश पाथरुट, योगेश सातपुते, भाग्यश्री भिटे व सारीका दरेकर अशा पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे विशेष पथक नेमुन खात्री करुन कारवाई करणे बाबत सुचना व मार्गदर्शन करुन पथक रवाना केले. पथकाने अहमदनगर शहरात पेट्रोलिंग फिरुन प्लास्टीक किंवा नायलॉन चायना मांजा विक्री करणारे इसमांची माहिती घेवुन कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई केली आहे.
कोतवाली 18/23 भादविक 188, 336 सह पर्यावरण संरक्षण अधिनियम क.5, 15 प्रमाणे प्रथमेश राजु करपे रा. वरवंडे गल्ली, माळीवाडा, अहमदनगर 13,300/- मोनाकिट व हिरोप्लस कंपनीचे 16 नग मांजा, कोतवाली 24/23 भादविक 188, 336 सह पर्यावरण संरक्षण अधिनियम क.5, 15 प्रमाणे चेतन कन्हैया चिपोळे वय 35, रा. जुना बाजार, हमालवाडा, अहमदनगर 24,000/- मोनाकिट कंपनीचे 27 नग मांजा, कोतवाली 28/23 भादविक 188, 336 सह पर्यावरण संरक्षण अधिनियम क.5, 15 प्रमाणे जावेद कासम शेख वय 36, रा. माळीगल्ली, केडगांव, अहमदनगर 31,300/- मोनो काईट फायटर, हिरोप्लस कंपनीचे 34 नग मांजा, एकुण तीन (03) आरोपी 68,600/- 77 नग विविध कंपनीचा प्लास्टीक, नायलॉन चायना मांजा तसेच यापुढे देखील अवैध चायना मांजाची विक्री करणारे इसमांविरुध्द कारवाई करण्यात येणार आहे.
सदरची कारवाई राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, प्रशांत खैरे साहेब, अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर, अजित पाटील साहेब, उविपोल नगर ग्रामिण विभाग, यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

No comments:

Post a Comment