या.. परिसरात चाकूचा धाक दाखवत दरोडा टाकणारे दोन आरोपी गजाआड. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, January 2, 2023

या.. परिसरात चाकूचा धाक दाखवत दरोडा टाकणारे दोन आरोपी गजाआड.

 स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.

कल्याण रोड, आगरकर मळा परिसरात चाकूचा धाक दाखवत दरोडा टाकणारे दोन आरोपी गजाआड.


अहमदनगर -
कल्याण रोड व आगरकर मळा परिसरात चाकूचा धाक दाखवून मध्यरात्री दरोडा टाकणार्‍या 2 दरोडेखोरांना सीसीटीव्ही फुटेच्या आधारे तपास करून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले असून रावन ऊर्फ छनक नादर चव्हाण, फिलीप नादर चव्हाण (दोघेही रा. सालवडगांव रोड, चिचोंडी पाटील, ता. नगर) असे त्या दोघांची नावे आहेत. या दोघांना अहमदनगर जिल्ह्यात आणखी किती ठिकाणी व कोठे कोठे दरोडा चोरी केली आहे. या बाबत विचारपुस केली असता आरोपींनी पावबाकी, संगमनेर तालुक्यातील सुकेवाडी येथे घरात प्रवेश करुन चाकुचा धाक दाखवुन चोरी केल्याची कबुली दिली. पुढील तपास कोतवाली पोलिस करीत आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, येथील कल्याणरोड परिसरातील विद्या कॉलनीतील रहिवासी यश - उमेश शेळके तसेच त्यांचे शेजारी राहणार्‍या तिघांच्या घरी अनोळखी 6 ते 7 इसमांनी घराचे दरवाजाचाकडीकोंडा कटावणीने तोडुन आत प्रवेश केला व सामानाची उचकापाचक करुन चाकुचा धाक दाखवुन 4 लाख 30 हजार 500 रूपये किंमतीचे सोन्या चांदीचे दागिने, दोन मोबाईल, रोख रक्कम, एसबीआय व आयसीआयसी बँकेचे एटीएमकार्ड दरोडा चोरी करुन चोरुन नेले होते. सदर घटने बाबत यश उमेश शेळके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
सदरच्या घटनेचा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांच्या आदेशान्वये दिनकर मुंडे, सफौ. मनोहर शेजवळ, पोहेकॉ. सुनिल चव्हाण, दत्तात्रयहिंगडे, संदीप पवार, बापुसाहेब फोलाणे, दत्तात्रय गव्हाणे, संदीप घोडके, फकिर शेख, देवेंद्र शेलार, विश्वास बेरड, पोना. शंकर चौधरी, विशाल दळवी, संदीप दरदंले, सचिन आडबल, भिमराज खर्से, दिपक शिंदे, पोकॉ. जालिंदर माने, विनोद मासाळकर, आकाश काळे, रणजीत जाधव, योगेश सातपुते, मेघराज कोल्हे, मपोकॉ. सारीका दरेकर, चापोहेकॉ. बबन बेरड, संभाजी कोतकर, अर्जुन बडे व भरत बुधवंत आदींची विशेष पथकाची नेमणुक करुन गुन्ह्याचा समांतर तपास करत होते.
दरम्यान पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना गुप्तबातमीदाराशोध घेतला परंतु ते मिळुन आले नाहीत. ताब्यात घेतलेल्या दोघांची अधिक चौकशी केली असता त्यांनी त्यांची नावे रावन ऊर्फ छनक नादर चव्हाण, फिलीप नादर चव्हाण असे असल्याचे सांगितले. त्यांच्याकडे वरील गुन्ह्याबाबत विचारपुस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र त्यांना अधिक विश्वासात घेवुन चौकशी केली असता त्यांनी त्यांच्या साथीदारांसह गुन्हा केल्याची कबुली दिल्याने दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले.

No comments:

Post a Comment