या ठिकाणाहुन अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रक पकडला. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, January 4, 2023

या ठिकाणाहुन अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रक पकडला.

 स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रक पकडला.


शेवगाव :
तालुक्यातील बोधेगाव ते गेवराई रस्त्यावर पिवळ्या रांगाचा हायवा ट्रक बेकायदेशीररित्या वाळू वाहतूक करताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी पकडला. चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून ट्रक व वाळू असा 15 लाख साठ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. शब्बीर बादशाह शेख (वय 32, रा. लाडजळगाव, ता. शेवगाव) असे ताब्यात घेतलेल्याचे नाव आहे.
अधिक माहिती अशी, बोधेगाव ते गेवराई रस्त्यावर बेकायदेशीररित्या हायवा ट्रकमधून वाळूची वाहतूक सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांनामिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी बोधगाव ते गेवराई रस्त्यावरील सुकळी फाटा येथे जावून सापळा वाळू वाहतूक करणारा हायवा ट्रक अडविला. चालकाकडे विचारपूस केली असता त्याने वाळू वाहतुकीचा परवाना नसल्याचे सांगितले. याप्रकरणी पोलिस पथकाने चालक शब्बीर शेख याला ताब्यात घेऊन वाळूसह ट्रक जप्त केला. शब्बीर शेख याच्यावर शेवगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. ही कारवाई सहायक फौजदार मनोहर शेजवळ, भाऊसाहेब काळे, पोलिस हेडकॉन्स्टेबल विजय वेठेकर, संदीप घोडके, पोलिस नाईक शंकर चौधरी, लक्ष्मण खोकले, रणजीत जाधव व कमलेश पाथरुट यांच्या पथकाने केली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here