राष्ट्रवादी काँग्रेसच्या या नेत्याच्या मुलाच्या लग्नात 700 जणांना विषबाधा. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, January 5, 2023

राष्ट्रवादी काँग्रेसच्या या नेत्याच्या मुलाच्या लग्नात 700 जणांना विषबाधा.

 राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याच्या मुलाच्या लग्नात 700 जणांना विषबाधा.


औरंगाबाद -
राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्याच्या मुलाच्या लग्नात 700 हून अधिक लोकांना विषबाधा झाली असून या सर्वांना औरंगाबादच्या वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अब्दुल कदिर मौलाना यांच्या मुलाचा काल रात्री लग्नसोहळा पार पडला आहे. या सोहळ्यात आलेल्या पाहुण्यांना विषबाधा झाल्याची माहिती मिळत आहे. यात कुठलीही जीवितहानी झाली नसून, बहुतांश रुग्णांना रात्रीच डिस्चार्ज देण्यात आला आहे.
अब्दुल कदिर मौलाना यांच्या मुलाचा काल 4 जानेवारी रोजी लग्नसोहळा पार पडला आहे. या सोहळ्यात पाहुण्यांनी जेवण केल्यानंतर काही वेळातच उलट्या व मळमळीचा त्रास सुरु झाला त्यामुळे त्यांना जवळच असलेल्या एमजीएम व घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा प्रकार जेवणातील विषबाधेमुळे झाला असल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांकडून वर्तविण्यात आला आहे.
जेवणानंतर सर्वांनी गोड पदार्थाचे सेवन केले होते. हा गोड पदार्थ खाल्ल्यानंतर काही वेळेतच पाहुण्यांना उलट्या व मळमळीचा त्रास जाणवू लागला.No comments:

Post a Comment