प्रेमप्रकरणातून वकिलाची हत्या.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, January 4, 2023

प्रेमप्रकरणातून वकिलाची हत्या..

 पिंपरी-चिंचवडमधील वकिलाची प्रेमप्रकरणातून हत्या!


पुणे - पिंपरी- चिंचवडमधील वकिलाची अनैतिक संबंधातून हत्या झाल्याचं समोर आलं असून या प्रकरणात तीन जणांना पिंपरी- चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. नात्यातील महिलेसोबत असलेल्या अनैतिक संबंधाच्या संशयावरून त्या महिलेच्या पतीने शिवशंकर शिंदे यांच अपहरण करून हत्या केली. 31 डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास शिवशंकर हे बेपत्ता झाल्याची तक्रार वाकड पोलिस ठाण्यात दिली होती.
शिवशंकर यांचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत महाराष्ट्रात- तेलंगणा सीमेवरील मदनुर येथे मृतदेह आढळला होता. तेथील पोलिसांनी तिघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी हत्या केल्याचं सांगितलं आहे. शिवशंकर आणि त्यांच्या नात्यातील महिलेचे गेल्या काही वर्षांपासून प्रेमसंबंध होते अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 31 डिसेंबर रोजी पिंपरी- चिंचवडमधील काळेवाडीतुन वकील शिवशंकर हे बेपत्ता झाले होते. त्यांची मोपेड दुचाकी ऑफिस बाहेर उभा होती. ऑफिसमध्ये आढळलेले रक्ताचे डाग यामुळं पिंपरी- चिंचवड पोलिसांना अपहरणाचा संशय होता. त्या दिशेने तपास सुरू असताना आज सकाळी शिवशंकर यांचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत महाराष्ट्रात- तेलंगाणा सीमेवर आढळला. या प्रकरणी तेथील पोलिसांनी तातडीने तिघांना ताब्यात घेतलं. त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता मुख्य आरोपीच्या पत्नीसोबत शिवशंकर यांचे अनैतिक संबंध असल्याचा संशय आरोपीला होता. त्यामुळं शिवशंकर यांचं अपहरण करण्याचा कट रचण्यात आला.
31 डिसेंबर रोजी मुख्य आरोपी त्याचा भाचा आणि चालक यांनी शिवशंकर यांच्या ऑफिसमध्ये गेले. तिथं त्यांच्या तोंडाला आणि हाताला चिकट पट्टी लावून अपहरण करण्यात आलं. ऑफिसमध्ये त्यांच्यात झटापट झाली. एका खासगी वाहनातून शिवशंकर यांना ड्रममध्ये डांबून महाराष्ट्रात - तेलंगणा सीमेवर घेऊन जाण्यात आलं. वाहनातून जात असतानाच शिवशंकर यांची हत्या करण्यात आली. पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने शिवशंकर यांचा मृतदेह जाळण्यात आला. परंतु, तो अर्धवट जळाला होता. पोलिसांनी तातडीने तिघांना ताब्यात घेतलं असून त्यांनी हत्या केल्याचं तपासात समोर आले आहे. शिवशंकर यांचे नात्यातील महिलेसोबत गेल्या काही वर्षांपासून प्रेमसंबंध होते. महिलेचा विवाह झालेला होता. शिवशंकर आणि त्या महिलेबाबत तिच्या पतीला माहिती मिळाली. यावरून महिलेचे आणि तिच्या पतीचे वाद होत होते. अखेर ती महिला पतीला सोडून राहात होती. याच रागातून आरोपीने शिवशंकर यांचं अपहरण करून हत्येचा कट रचला होता. अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.

No comments:

Post a Comment