नामांतर करण्यापूर्वी शहरासाठी हे करा, जनता तुम्हाला डोक्यावर घेईन - जयंत येलुलकर. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, January 4, 2023

नामांतर करण्यापूर्वी शहरासाठी हे करा, जनता तुम्हाला डोक्यावर घेईन - जयंत येलुलकर.

 नामांतर करण्यापूर्वी शहरासाठी हे करा, जनता तुम्हाला डोक्यावर घेईन - जयंत येलुलकर.

अहमदनगर - ज्या निजामशाहीच्या काळात राजधानी असलेलं अहमदनगर शहराची तुलना कैरो बगदाद यां सुंदर शहराशी होत असे,शहराचे विकासाचे नियोजन आदर्श समजले जाई. येथील खापरी नळ पाणी योजनेचे व्यवस्थापन समजून घेण्यासाठी देशाच्या विविध भागातून संबधित या शहरांत येतं असतं. त्या शहराची आजची दशा काय आहे.? आता पुन्हा एकदा महान व्यक्तिमत्वाची नावे तूम्ही या शहराला देणाचा घाट घालत आहात, नक्की यांचा यामागे कोणता हेतू आहे. स्वतःचा राजकीय पोळी भाजून घेण्याचा डाव आहे की धर्माधर्मा मधे निष्कारण तेढ निर्माण करण्याचा प्रकार.. हेचं कळेनासे झाले असुन यामधे भूमिपुत्र असलेल्या नगरकरांना कोणी खिजगणतीत घ्यायलाही तयार नाही. असे प्रतिपादन रसिक ग्रुपचे अध्यक्ष,माजी नगरसेवक जयंत येलुलकर यांनी केले आहे.
या महान,आदर्श व्यक्तिमत्वाविषयी प्रत्येकाच्या मनात प्रचंड आदर व कृतज्ञतेची भावना आहे.त्यांचे येथील मातीशी नाते आहे हा या शहराचा गौरव आहे. खरेतर या महान व्यक्तीमत्वांनी आपल्या लोकसेवेच्या कार्यातून, आपल्या जगण्यातून सार्‍या जगाला प्रेरणा दिली. त्यांचे योगदान आदर्श मानून त्यांच्या कार्याला पुढें नेल्यास ते खरे या गौरवशाली व्यक्तीमत्वांना,त्यांच्या स्मृतींना अभिवादन ठरेल. म्हणूनच कोणतेही नामांतर करण्यापूर्वी या शहराचा असा चौफेर  विकास करा की ज्यांची नावे या शहराला देणार आहात. त्यांचा खर्‍या अर्थानं गौरव व्हायला हवा.  म्हणूनच नामांतराची मागणी करण्यापूर्वी कोणत्याही नेत्यांनी शहराच्या औद्योगिक, पर्यटन विकासासाठी दहा हजार कोटींचा निधी मिळवून द्यावा. त्याचा योग्य विनियोग कसा होईल याकडे लक्ष द्यावे. तर नगरकर तुमच्यापुढे नतमस्तक होऊन तुम्हाला वंदन करतील. असे येलुलकर यांनी म्हटले आहे.
म्हणूनच अधिक वेळ न दवडता प्रथम शहराचा विकास हाती घेतं शहराला सुजलाम सुफलाम करावें. नागरिकांच्या चेहर्‍यावर शहर विकासाचा आनंद दिसू दया.अन्यथा हे केवळ स्वतःचे  राजकारण पुढें नेण्याचा प्रयत्न आहे. शहराच्या अनेक प्रश्नांवरून ध्यान वळविण्याचा हा डाव असु शकतो ही भावना जनतेमध्ये निर्माण होईल.म्हणून ज्या महान व्यक्तींनी त्यांच्या जगण्यातून सार्‍या जगाला प्रेरणा दिली. त्या मूल्यांचा,लोकसेवेचा आदर्श घेत शहराचा विकास हाती घ्यायला हवा. एकतर आमच्या शहराची काही वर्षापूर्वी सेन्सिटिव्ह शहर अशी ओळख होती. ती आता हळूहळू पुसली जातेय. परंतु सेन्सिटिव्ह हा शिक्का या शहरावर बसल्यामुळे शहराचे अतोनात नुकसान झाले आहे. याचा प्रचंड मोठा फटका औद्योगिक विकासाला बसला. मोठें कारखाने येथे येण्यासाठी अनुत्सुक दिसले. म्हणूनच नामांतर करण्यापेक्षा शहराची आजची स्थिती काय आहे. याचा गांभिर्याने विचार करुन शहराच्या पर्यटन, औद्योगिक विकासासाठी 10,000 कोटीचा निधी राज्य, केंद्र शासनाकडून मिळवावा व उदासीन तेची मानसिकता नष्ट होत एक चांगले वातावरण निर्माण व्हावे अशी भावना येलुलकर यांनी व्यक्त केली. नाहीतर एकेकाळी निजामशाहीची सुंदर राजधानी असलेल्या या शहराची आजची स्थिती अत्यंत दयनीय झाली असतानाही आम्हीं राजधानीचे शहर राजधानीचे शहर म्हणुन बेभान होत नाचत आहोत. स्वताच्या पाठीवर हात थोपटून घेतच आहोत. असे येलुलकर यांनी नमूद केले आहे.


No comments:

Post a Comment