नगर शहरात रंगला युवक-युवतींचा फॅशन जलवा, नगरची धनश्री वाघ विजेता. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, January 6, 2023

नगर शहरात रंगला युवक-युवतींचा फॅशन जलवा, नगरची धनश्री वाघ विजेता.

 नगर शहरात रंगला युवक-युवतींचा फॅशन जलवा, नगरची धनश्री वाघ विजेता.

टी सिरीजच्या वतीने विजेत्यांना पंजाबी अल्बम मध्ये काम करण्याची संधी.


अहमदनगर -
आयकॉनिक मॉडेलिंग इन्स्टिट्यूट आणि मिस्टर इंडिया इंटरनॅशनल स्टार प्रज्वल भिंगारदिवे प्रेजेंट्स मिस्टर अ‍ॅण्ड मिस ग्लॅम आयकॉन ऑफ महाराष्ट्र 2022-23 सीजन 4 स्पर्धेचा ग्रँड फिनालेचा फॅशन शो उत्साहात पार पडला. रॅम्पवर अवतरलेल्या तरुणाईने सर्वांचे लक्ष वेधले. तर चिमुकल्या मॉडेल्सनी देखील आपल्या कलेचे सादरीकरण करुन उपस्थितांची मने जिंकली.
या फॅशन शो मध्ये नगरची धनश्री वाघ व बारामतीचा प्रेम गोलांडे याने टायटल किताब पटकावून विजेते ठरले. या दोघांना टी सिरीजच्या पंजाबी अल्बम साँग मध्ये काम करण्याची संधी मिळाली असून, एक वर्षासाठी कामाचे कॉन्ट्रॅक्ट बक्षिस स्वरुपात मिळाले आहे.
तसेच या स्पर्धेत रनरप अमीर हमजा सुभेदार, अक्षदा वर्मा, सेकंड रनरअप फरहान शेख (वैजापूर), अनन्या इथापे, थर्ड रनरअप रवी आहेरे (वैजापूर), पलक कंत्रोड, बेस्ट परफॉर्मन्स जुबेर पठाण, पृथ्वी जाधव ठरले. या स्पर्धेमध्ये मेघा मकासरे, चैत्राली भराड, शिलानी धुमाल, प्रिया घायतडक, अंजली दळवी, मैत्री पुप्पाल, ऋषिकेश शिंदे, शुभम नन्नवरे, रवींद्र व तुषार जाधव (औरंगाबाद) विजेते ठरले. तर लहान मुलांमध्ये सृष्टी उदमले आणि अफजान शेख (औरंगाबाद) विजेते ठरले. तसेच हिरा पालवे, माहेरा शेख, ओम पिसाळ (मुंबई), अरहान जागीरदार, कनिका, इशिका, राजेश्‍वरी विविध मानांकनासाठी विजेते ठरले असल्याची माहिती फॅशन डिझायनर स्वप्निल भोसले यांनी दिली.
या स्पर्धेचे परीक्षक म्हणून रिल स्टार अ‍ॅक्टर हिंदवी सातकर पाटील, वैष्णवी जाधव-आवटी, प्रज्वल भिंगारदिवे यांनी काम पाहिले. या फॅशन शोच्या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, सामाजिक न्याय विभागाचे सुरेश बनसोडे, ओबीसी सेलचे अमित खामकर उपस्थित होते. फॅशन शोसाठी टायटल स्पॉन्सर पानफंडा, अहमदनगर बॉम्बे टेक्सटाईल, बॉम्बे बेकरी, ड्युडी फॅशन, साहिल बागवान, संकेत शिंदे (मेकअप), कुमार कदम (फोटोग्राफी), आर.एस. स्टुडिओ, शफान अली हेअर स्टुडिओ, मनश्री ज्वेलरी, ड्रीमर्स डान्स अकॅडमी, युनिक लाईट इव्हेंटचे मोईन सय्यद यांचे सहकार्य लाभले. सर्व विजेत्यांना आमदार संग्राम जगताप यांनी शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment