अहमदनगर नामांतराबाबत मनसेही सरसावली.. केली ही मागणी. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, January 6, 2023

अहमदनगर नामांतराबाबत मनसेही सरसावली.. केली ही मागणी.

 मनसेचे मनपा आयुक्तांना निवेदन.

नगरचे नाव ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर’ करण्यात यावे.


नगर - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने अहमदनगर जिल्ह्याचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर करण्यात यावे, या मागणीचे निवेदन मनपा आयुक्त डॉ.पंकज जावळे यांना मनसेच्यावतीने देण्यात आले. 
आयुक्तांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आपल्या मराठी मायभुमीत अनेक स्त्रीरत्ने जन्माला आली आणि महाराष्ट्र भुमी पवान झाली. राजमाता जिजाऊ, महाराणी ताराबाई, झाशीची राणी लक्ष्मीबाई, सावित्रीबाई फुले या इतिहास कालीन वीरकन्या राजमाता बरोबरच पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे नाव इतिहासात अजरामर आहे. या अमर महान मातेचा जन्म आपल्या जिल्ह्यात 31 मे 1725 रोजी वडिल माणकोजी शिंदे, आई सुशिलाबाई यांच्या पोटी पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या जन्म जामखेड तालुक्यातील चौंडी या गावी झाला.
पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे काम सदैव जनतेच्या मनात कायम रहावे, यासाठी नुकताच झालेल्या नागपूर येथील अधिवेशनात अहिल्यादेवीचे नाव जिल्ह्यास देण्याबाबत ठराव मांडण्यात आला होता. त्यास सरकारने सहमती दर्शविलेली आहे. त्याचबरोबर सदर प्रस्ताव मनपाकडून पारित करुन घेण्यासाठी सरकारने मनपाला आदेश दिले आहेत. सदर प्रस्ताव महासभेत आणावा लागणार आहे.
जिल्ह्यातील अहिल्यादेवीनगर या नामांतरास महाराष्ट्र निर्माण सेनेचा पूर्ण पाठिंबा आहे. तरी आपण या प्रस्तावावर सहानुभूतीपूर्वक विचार करुन पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे महान कार्य जनतेपुढे कायम स्मरणात रहावे, याची काळजी घ्यावी, अशी विनंती आम्ही आपणास मनसेच्यावतीने करत आहोत, असेही निवेदनात म्हटले आहे.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, शहराध्यक्ष गजेंद्र राशीनकर, सचिव डॉ.संतोष साळवे, उपाध्यक्ष तुषार हिरवे, गणेश शिंदे, संदिप चौधरी, दिपक दांगट, विभाग अध्यक्ष महेश चव्हाण, इंजि.विनोद काकडे आदि उपस्थित होते.

No comments:

Post a Comment