वाडियापार्क जलतरण तलावात लघुशंका केल्याच्या निषेधार्थ शिवराष्ट्र सेनेचे जलसमाधी आंदोलन... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, January 11, 2023

वाडियापार्क जलतरण तलावात लघुशंका केल्याच्या निषेधार्थ शिवराष्ट्र सेनेचे जलसमाधी आंदोलन...

 'त्या' ठेकेदारावर गुन्हा दाखल करून ठेका रद्द करावा- शिवराष्ट्र सेनेचे अध्यक्ष संतोष नवसुपे.


अहमदनगर -
शहरातील वाडीया पार्क येथील जलतरण तलावात काही दिवसांपूर्वी लघुशंका करत असतानाच सोशल मीडियावर एक फोटो व व्हिडिओ व्हायरल झाला होता. तसेच या ठिकाणी काही लोक मधपान पार्टी करत असल्याच्या धक्कादायक गोष्टी घडत असल्याचे लक्षात आल्या नंतर या प्रकाराबाबत शिवराष्ट्र सेनेने आवाज उठवला होता. या चुकीच्या गोष्टींबाबत जलतरण तलाव ज्या संस्थेला चालवण्यास दिला आहे त्या संस्थेवर कारवाई करावी अशी मागणी शिवराष्ट्र सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी यांना निवेदन देऊन करण्यात आली होती तसेच ज्या कर्मचाऱ्यांनी चुकीचे कृत्य केले आहे. त्याला कामावरून काढत ठेकेदाराचा ठेका रद्द करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली होती.
मात्र जिल्हा क्रीडा विभागाने शिवराष्ट्र सेनेने दिलेल्या निवेदनाला आणि त्यानंतर दिलेल्या स्मरण पत्राला केराची टोपली दाखवत जलतरण तलावाचा ठेका घेणाऱ्या ए.के. ग्रुप इंजिनियर या संस्थेवर कोणतीही कारवाई केली नव्हती. व व्हायरल झालेल्या फोटो बाबत चौकशी करून संस्थेचा ठेका रद्द करावा अशी मागणी करून सुद्धा वर्षभरात जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी कोणतीच कारवाई केली नसल्याने अखेर आज शिवराष्ट्र सेनेच्या वतीने वाडिया पार्क येथील जलतरण तलावात जलसमाधी घेण्यासाठी अध्यक्ष संतोष नवसुपे यांनी जलतरण तलावात उडी घेऊन आंदोलन केले. जलसमाधीचे निवेदन जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना  देण्यात आले होते. मात्र या निवेदनाकडे जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचं दिसून आले होते. कारण जेव्हा शिवराष्ट्र सेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आंदोलन करण्यासाठी जलतरण तलावर आले असताना आणि संतोष नवसुपे यांनी पाण्यात उडी घेतली त्यावेळी फक्त त्या ठिकाणी बंदोबस्तासाठी पोलीस उपस्थित होते.

शिवराष्ट्र सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालया बाबत तीव्र नाराजी दर्शवली ज्यांच्या अधिपत्याखाली हे जलतरण तलाव सुरू आहे त्याच अधिकाऱ्यांना प्रश्नाचे गांभीर्य नसल्याने शिवराष्ट्र सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. व अखेर पोलिसांच्या मध्यस्थीने जिल्हाक्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले या जलतरण तलावर आल्यानंतर याबाबत लवकरच ठेकेदारावर कारवाई करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.येणाऱ्या काळात जलतरणपटू यांच्या रक्षणासाठी सदैव पाठीशी राहून न्याय मिळवून देणार अशी माहिती शिवराष्ट्र सेनेचे जिल्हाध्यक्ष संतोष नवसुपे यांनी दिली आहे. 

आंदोलन प्रसंगी मा नगरसेवक अनिल शेकटकर, बाबासाहेब करपे, मनोज औशीकर, संजय सुगंधी, गणेश शेकटकर, आनंद बगन, राकेश सारवान, सुनिता चौहान,  सौ.शितल चोटीले आदी उपस्थिती होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here