आ. लंकेंच्या माध्यमातून रूग्णांना १२ लाखांची मदत...! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, December 28, 2022

आ. लंकेंच्या माध्यमातून रूग्णांना १२ लाखांची मदत...!

 मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ..!

आ. लंकेंच्या माध्यमातून रूग्णांना १२ लाखांची मदत...!


नगरी दवंडी 
पारनेर  प्रतिनिधी - मतदारसंघातील विविध आजारांमुळे रूग्णालयात दाखल झालेल्या रूग्णांना आमदार नीलेश लंके यांनी सहा महिन्यांत ११ लाख ६५ हजार रूपयांचीमदत मिळवून  दिली. 
पारनेर-नगर मतदारसंघातील अनेक नागरीक आ. लंके यांच्याकडे रूग्णालयात दाखल असलेल्या रूग्णांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी येतात. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळवून देण्यासाठी आ. लंके यांच्या कार्यालयाकडून तात्काळ कार्यवाही करण्यात येते. प्रत्येक रूग्णास मदत मिळाली पाहिजे यासाठी आ.लंके हे स्वतः जातीने लक्ष घालतात. मुख्यमंत्री सहाय्यता निधीबरोबरच विविध सामाजिक संघटना यांच्याकडूनही मदत मिळावी यासाठी आ. लंके हे स्वतः बोलून काही ना काही मदत मिळवून देतात. सेवाभावी रूग्णालयांमध्ये अनेक रूग्णांवर त्यांनी मोफत उपचारही करून दिले आहेत. 
गेल्या सहा महिन्यात आ. लंके यांच्या माध्यमातून मदत मिळालेले विविध रूग्ण पुढीलप्रमाणे विश्‍वराज प्रवीण फलके २५ हजार, सारीका सोपान राजदेव ५० हजार, बाबुराव मारूती बुगे ६० हजार, अभिषेक भरत काळे १ लाख, प्राजक्ता विष्णू गायकवाड २५ हजार, संदीप लक्ष्मण सपकाळ १ लाख, पिरमहंमद गुलाब शेख १ लाख, महेश बाबूराव तागड ५० हजार, सौरव बापू आमटे ५० हजार, अविनाश रंगनाथ गाडेकर ५० हजार, ज्ञानेश्‍वरी जालिंदर नगरे ३० हजार, ज्ञानेश्‍वर सुखदेव घुले २५  हजार, जनाबाई कोंडीबा काळे १ लाख, बाबासाहेब बबनराव भोर १ लाख, अनिल रामभाऊ इथापे १ लाख, जयश्री भाऊसाहेब वामन ७५ हजार, इंद्रभान तुकाराम रेपाळे पुणेवाडी ७५  हजार, शुभम पाडळकर वेसदरे ५० हजार.

No comments:

Post a Comment