चंद्रकांत पाटलांच्या वक्त्यव्याचे नगरमध्ये पडसाद.भाजपाच्या वाचाळविरांचे महाराष्ट्राला बदनाम करण्याचे षडयंत्र - कदम. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, December 10, 2022

चंद्रकांत पाटलांच्या वक्त्यव्याचे नगरमध्ये पडसाद.भाजपाच्या वाचाळविरांचे महाराष्ट्राला बदनाम करण्याचे षडयंत्र - कदम.

 चंद्रकांत पाटलांच्या वक्त्यव्याचे नगरमध्ये पडसाद.

भाजपाच्या वाचाळविरांचे महाराष्ट्राला बदनाम करण्याचे षडयंत्र - कदम.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः गेल्या काही दिवसापासून भाजपाच्या वाचाळवीरांनी महाराष्ट्राला बदनाम करण्याचे मोठे षडयंत्र सुरु केले असल्याचे दिसून येत आहे. ज्या राष्ट्र पुरुषांनी महाराष्ट्र घडविला, त्यांच्या विरोधात बेताल वक्तव्य करुन चुकीचा इतिहास लोकांसमोर मांडण्याचे उद्योग सुरु आहेत. भाजपाचे राज्यपाल, मंत्री, प्रवक्ते यांनी महाराष्ट्राला बदनाम करण्याची जणु सुपारीच घेतली आहे का? अशी शंका निर्माण होत आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्र पुरुषांबाबत केलेले वक्तव्य हा त्यांच्या त्यागाचा अपमान आहे. या राष्ट्र पुरुषांची जनसामान्यातील प्रतिमा मलिन करण्याचा सातत्याने प्रयत्न होत आहे. भाजपाचा हा डाव शिवसेना  यशस्वी होऊ देणार नाही, त्यांना शिवसेना स्टाईलनेच उत्तर दिले जाईल, असा इशारा शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम यांनी दिली.

मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्र पुरुषांबद्दल केलेल्या बेताल वक्तव्याचा शहर शिवसेनेच्यावतीने माळीवाडा येथे मंत्री पाटील यांच्या प्रतिमेवर चिल्लर फेकून आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी बाळासाहेब बोराटे म्हणाले, आपले राष्ट्रपुरुष हे सर्वांसाठी वंदनीच आहे, त्या महापुरुषांचा चुकीचा इतिहास जनतेसमोर मांडून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न भाजपाचे नेते गेल्या काही दिवसांपासून करत आहे. त्यांच्या अशा वक्तव्यांने जनेतमध्ये तीव्र चिड निर्माण होत आहे. अशी प्रवृत्ती वेळीच ठेचली जाईल, असे सांगितले. यावेळी लोकांकडून चिल्लर गोळा करुन मंत्री पाटील यांच्या प्रतिमेवर उधळण्यात आली. तसेच त्यांच्या प्रतिमा पायदळी तुडविण्यात आल्या व निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.
याप्रसंगी शहरप्रमुख संभाजी कदम, माजी विरोधीपक्ष नेता संजय शेंडगे, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, स्मीता अष्टेकर, गणेश कवडे, सचिन शिंदे, शाम नळकांडे, प्रशांत गायकवाड, दत्ता जाधव, दत्ता कावरे, संतोष गेनप्पा, परेश लोखंडे, रवि वाकळे, संदिप दातरंगे, विठ्ठल जाधव, अरुण झेंडे, संजय आव्हाड, शरद कोके, अभिजित अष्टेकर, अशोक तुपे, पप्पू भाले, रमेश खेडकर, अंगद महानवर आदि उपस्थित होते.

No comments:

Post a Comment