स्टील चोरी करणारी टोळी गजाआड. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, December 23, 2022

स्टील चोरी करणारी टोळी गजाआड.

 स्टील चोरी करणारी टोळी गजाआड.

12 लाख 81 हजार रुपये किंमतीचे स्टील, ट्रॅक्टर फोर व्हीलर सह मुद्देमाल जप्त.


राहुरी ः
लोखंडी स्टील चोरीच्या गुन्ह्यातील पाचही आरोपींना रवी पोलिसांनी जेरबंद केले असून आरोपींकडून 12 लाख 89 हजार रुपये किमतीचे स्टील व गुन्हात वापरलेला महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर टाटा कंपनीची गाडी जप्त केली आहे.
प्रस्तुत बातमीची हकीकत अशी की, राहुरी पोस्टे गु.र.नं ॥ 1156/ 2022 भादवि कलम 379 प्रमाणे दाखल गुन्ह्यतील स्टील चोरी करणारे आरोपी व मुद्देमाल तात्काळ शोध घेणेबाबत मा. श्री. राकेश ओला सो पोलीस अधिक्षक सो अनगर व श्रीमती स्वाती भोर मॅडम, अपर पोलीस अधिक्षक, श्रीरामपुर भाग यांनी पोनि / प्रताप दराडे यांना तात्काळ कारवाई करणेबाबत आदेश दिलेले होते.
सदर आदेशाप्रमाणे राहुरी पोलीस स्टेशनकडील पोनि / प्रताप दराडे यांचे मार्गदर्शनाखाली कारवाई करणेत आली आहे.
सदर बाबत पोनि प्रताप दराडे यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहीती मिळाली कि आरोपी अभिषेक बाबासाहेब हुडे, हर्षल दत्तात्रय ढोकणे दोघे रा. उंबरे ता. राहुरी यांनी गुन्हा केलेला आहे. गोपनीय माहीती मिळाल्याने सदर आरोपी यांना सापळा लावुन उंबरे शिवारात जेरबंद करुन त्यांना सदर गुन्ह्याबाबत विचारपुस केली असता सदरचा गुन्हा हा आम्ही व जयेश उर्फ गुलाब बाबासाहेब ढोकणे छोट, उर्फ सौरभ संजय दुशिंग, राहुल दादु वैरागळ सर्व रा. उंबरे ता. राहुरी जि. अनगर असे आम्ही मिळुन केल्याची कबुली दिली आहे. सदर आरोपी यांनी गुन्ह्यातील एकुन मुद्देमाल 12 लाख 81 हजार रुपये किंमतीचे लोखंडी स्टील व गुन्हा करणेकामी वापरलेले महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर, ढअढअ कंपनीची अउए मॉडेलची गाडी हे आरोपींनी दाखवल्याने वरील मुद्देमाल जप्त करणेत आलेला आहे. पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी राहुरी पोलीस स्टेशनकडील कारवाई करणेकामी खोंडे, चंद्रकांत ब-हाटे, दिनकर चव्हाण, सोमनाथ जायभाय, अमित राठोड,  अदिनाथ पाखरे, सचिन ताजणे, संतोष राठोड, गणेश लिपणे, नदिम शेख, अमोल पडोळे यांचे विशेष पथक नेमण्यात आले होते. सदरची कारवाई राकेश ओला, पोलीस अधिक्षक, अ.नगर स्वाती भोर, अपर पोलीस अधिक्षक श्रीरामपुर भाग व संदिप मिटके, उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपुर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली राहुरी पोलीस स्टेशन येथील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी केलेली आहे.

No comments:

Post a Comment