जिल्ह्यातील रेल्वे माथाडी कामगारांचा आंदोलनाचा इशारा ः अविनाश घुले. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, December 23, 2022

जिल्ह्यातील रेल्वे माथाडी कामगारांचा आंदोलनाचा इशारा ः अविनाश घुले.

 न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी होत नसल्याच्या निषेधार्थ.

जिल्ह्यातील रेल्वे माथाडी कामगारांचा आंदोलनाचा इशारा ः अविनाश घुले.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः हुंडेकरी व वाहतूक संघटने माल धक्क्यावरील हमालीदारांबाबत उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली याचिका फेटळण्यात आली असून माल धक्क्यावरील हमालीचे दराची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले असताना या आदेशाची अंमलबजावणी होत नसल्याचे निषेधार्थ जिल्ह्यातील रेल्वे माथाडी कामगारांच्या वतीने आंदोलन केले जाईल असा इशारा जिल्हा हमालपंचायतीचे अध्यक्ष अविनाश घुले यांनी दिला आहे.
रेल्वे माल धक्क्यावरील कामगारांनी बैठक नुकतीच संपन्न झाली या बैठकीस जिल्हा हमाल पंचायतीचे अध्यक्ष अविनाश घुले, सल्लागार बाबा आरगडे, अक्षर मानव संघटनेचे राज्य संघटक जावेदा जिंदगी, नगरसेवक प्रशांत गायकवाड, विलास उबाळे आदि उपस्थित होते. याप्रसंगी अविनाश घुले यांनी कोर्टाने दिलेल्या निकालाची अंमलबजावणी न करता गेल्या वर्षभरापासून कोर्टाचा अपमान होत आहे. संबंधित कामगार विभागाकडून होत असलेल्या अन्याय यापुढे कामगार सहन करणार नाही. सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या कार्यपद्धती कामगारांचे नुकसान करणारी आहे. असे स्पष्ट केले.
मार्च 2021 ला करार संपुष्टात आला आहे.  हुंडेकरी व वाहतुक संघटनेचे पदाधिकारी वारंवार गैरहजर राहत असल्याने  करारा संदर्भात कोणताही तोडगा निघत नसल्याने एकमत होत नसल्याने माथाडी मंडळाने इतर रेल्वे माल धक्क्यावरील हमालीचे दर तपासून दि.28/07/2021 रोजी आदेश पारित केले. या आदेशास हुंडेकरी व वाहतुक संघटना यांनी उच्च न्यायालयात या आदेशास स्थगिती मिळावी, यासाठी धाव घेतली, परंतु त्यांची मागणी फेटाळून लावली. माथाडी मंडळाने काढलेल्या आदेशाची अंमलबजावणी करावी, अशी माथाडी मंडळाच्या विरोधात उबाळे यांनी मा. उच्च न्यायालयात दाद मागितली. त्यानंतर कोर्टाने माथाडी मंडळाला मंडळाच्यावतीने त्यांचे काही म्हणजे असल्यास ते कोर्टासमोर सादर करण्यास सांगितले असता, माथाडी मंडळाचे अध्यक्ष श्री.कवळे यांनी आदेशाची अंमलबजावणी करणार असल्याचे म्हणणे कोर्टासमोर सादर केले. श्री. उबाळे यांनी कोर्टात केलेल्या मागणीला मंडळाच्या अध्यक्षांनी सहमती दिल्यामुळे कोर्टाने प्रकरण निकाली काढले.
कोर्टासमोर म्हणणे सादर करुनही आदेशाची अंमलबजावणी होत नसल्याचे पाहून अंमलबजावणी कधी करणार या संदर्भात मंडळाला वारंवार पत्रव्यवहार केला, परंतु आजपर्यंत पत्राला उत्तर पण मिळाले नाही आणि आदेशाची अंमलबजावणी पण झाली नाही. या विरोधात रेल्वे माथाडी कामगारांनी आंदोलनाचा इशारा दिला असल्याचे यावेळी अविनाश घुले यांनी सांगितले. येथील सहाय्यक कामगार आयुक्त यांनी मागील तीन वर्षात केलेल्या कामांची आणि कामगार विभागात होणार्या घोटाळ्यांची चौकशी व्हावी, कामगार विभागाच्या नाकर्तेपणामुळे आणि थापेबाजी व आर्थिक घोटाळ्यांमुळे जिल्ह्यातील कामगारांच्या समस्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे मत जावेदा जिंदगी यांनी व्यक्त केले. कॉ.बाबा आरगडे यांनी आजवर आपल्या न्याय हक्कासाठी कामगारांना लढा दिला आणि यापुढेही देत राहू. वेतनवाढ आणि उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार फरक तात्काळ देण्यात यावा, अन्यथा अधिवेशन काळात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी दिला.

No comments:

Post a Comment