आ. लंकेंच्या उपोषणाला जामखेडच्या तालुक्यातील 35 सरपंचांचा जाहीर पाठिंबा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, December 10, 2022

आ. लंकेंच्या उपोषणाला जामखेडच्या तालुक्यातील 35 सरपंचांचा जाहीर पाठिंबा

 आ. लंकेंच्या उपोषणाला जामखेडच्या तालुक्यातील 35 सरपंचांचा जाहीर पाठिंबा 


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
जामखेड ः अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या मार्गाच्या दुरुस्तीसाठी गेल्या तीन दिवसा लोकनेते आमदार निलेश लंके हे उपोषणाला बसले असून जामखेड तालुक्यातील 35 गावच्या सरपंचांनी त्यांच्या उपोषणाला जाहीर पाठिंबा दर्शवला आहे. समाज हिताच्या कृष्णासाठी झटणारे लोकनेते आमदार निलेश लंके यांच्या अमरण उपोषणाला मोठा पाठिंबा मिळत असून हे प्रश्न तात्काळ निकाली निखिल अशी अपेक्षा आहे.
लोकनेते आमदार निलेश लंके साहेब यांनी नगर जिल्यातील महामार्गच्या दुरस्थीसाठी आपण करत असलेल्या उपोषला जामखेड तालुक्यातील 35 सरपंच यांचा जाहीर पाठिंबा देण्यात आला त्यावेळी जामखेड सरपंच शिस्ट मंडळचे गुरेवाडी महारुळी सरपंच लक्ष्मण ढेपे सर, बावीचे सरपंच निलेश पवार, सावरगावचे सरपंच काकासाहेब चव्हाण, कुसडगावचे सरपंच शहाजी गाडे तसेच युवा नेते राहुल कवादे यांच्या उपस्थतीत जामखेड तालुक्यातील गुरेवाडी महारुळी, फक्राबाद, मोहा, सावरगाव, कुसडगाव, बावी, घोडेगाव, राजुरी, पाळली, मोहरी, झिक्रि, जवळा, धोडपारगाव, कवडगाव, धानोरा, देवदैठण, नाहुली, पाटोदा, पिपळगाव उडा, बाळगव्हाण, लोणी, बोर्ले, चोडी, खाडवी, आघी, साकत, हाळगाव, तसेच आदी सरपंच यांनी पाठिंबा दर्शविला आहे.

जनतेचा आमदार उपोषण करतोय ; पाठिंबा तर मिळणारच
सर्वसामान्य जनतेसाठी झटणारा एकमेव लोकनेते म्हणून आमदार निलेश लंके यांच्याकडे पाहिलं जात सध्या नगर जिल्ह्यातील महामार्गाच्या दुरुस्तीसाठी आमरण उपोषण सुरू केले आहे त्यांच्या मागणीची दखल नक्कीच घेतली जाईल आणि सर्वसामान्यांना न्याय मिळवून देतील यातील मात्र शंका नाही जामखेड तालुक्यातील 35 गावच्या सरपंचांनी देखील या आमरण उपोषणाला जाहीर पाठिंबा दिला आहे.

No comments:

Post a Comment