विधानभवन परिसरात विरोधकांची जोरदार घोषणाबाजी. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, December 29, 2022

विधानभवन परिसरात विरोधकांची जोरदार घोषणाबाजी.

 विधानभवन परिसरात विरोधकांची जोरदार घोषणाबाजी.

महाराष्ट्राला धोका... मंत्र्यांना खोका’.


नागपूर :
राजीनामा द्या, राजीनामा द्या.. भ्रष्ट मंत्री राजीनामा द्या, विदर्भ हैराण, सत्ताधारी खातो गायरान, खाऊन खाऊन 50 खोके.. माजले बोके, माजले बोके अशा हाती खोके आणि बोके घेऊन घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी सत्ताधार्‍यां विरोधात जोरदार निदर्शने केली. विधीमंडळाचे अधिवेशन अंतिम टप्प्यात असताना आंदोलने जोरात आहेत. काल संत्री तर आज खाली खोके हातात घेऊन विरोधकांनी हकालपट्टी करा, हकालपट्टी करा.. खोकेवाल्यांची हकालपट्टी करा.. म्हणत सत्ताधार्‍यांना धारेवर धरले. आमदारांनी हातात टेडीबर्डचे बोके व खाली खोके हातात घेऊन सरकारचा निषेध केला.
विधिमंडळ अधिवेशनाच्या दुसर्‍या आठवड्यातील चौथ्या दिवसाचे कामकाज सुरू होताच आजही विरोधकांनी विधान भवनाच्या पायर्‍यांवर जोरदार घोषणाबाजी केली. सत्ताधार्‍यांविरोधात आक्रमक सूर आळवला. हकालपट्टी करा, हकालपट्टी करा.. भ्रष्ट मंत्र्यांची हकालपट्टी करा, शेतकर्‍यांना धोका, मंत्र्यांना खोका.. विदर्भाला धोका, मंत्र्यांना खोका, महाराष्ट्राला धोका मंत्र्यांना खोका, शेतकरी हैराण, सरकार खातो गायरान, सीमावासी हैराण.. सरकार खातो गायरान या घोषणांनी विरोधकांनी विधानभवन परिसर दणाणून सोडला.
या आंदोलनात विधान सभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, नाना पटोले, रोहित पवार, यशोमती ठाकूर, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड भास्कर जाधव, सचिन अहीर, विकास ठाकरे यांच्यासह सर्व विरोधी पक्षाचे आमदार सहभागी झाले होते.

No comments:

Post a Comment