निलंबित अधिकार्‍यांच्या समर्थनार्थ कर्जतमध्ये महविकास आघाडीचा मोर्चा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, December 29, 2022

निलंबित अधिकार्‍यांच्या समर्थनार्थ कर्जतमध्ये महविकास आघाडीचा मोर्चा

 निलंबित अधिकार्‍यांच्या समर्थनार्थ कर्जतमध्ये महविकास आघाडीचा मोर्चा.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
कर्जत ः स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी आ. राम शिंदेकडून दोन महत्वपूर्ण अधिकार्‍यांचे निलंबन केल्याचा निषेध करत अधिकार्‍यांच्या समर्थनार्थ कर्जतमध्ये महाविकास आघाडीकडून मोर्चा  काढण्यात आला.
कर्जत येथील छ. शिवाजी महाराज चौकातून निघालेल्या या रॅलीमध्ये अनेक ज्येष्ठ नागरिक हातात निषेधाचे काळे फलक घेऊन सहभागी झाले होते. तहसील कार्यालयात या रॅली समोर बोलताना अनेकांकडुन मनोगते व्यक्त करत निषेध करण्यात आला.  काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके यांनी बोलताना
केवळ अधिकार्‍यांविषयी असणार्‍या आकासापोटी आणि स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी आ. राम शिंदे यांनी प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले आणि तहसीलदार नानासाहेब आगळे यांचे निलंबन केले असल्याचा आरोप करताना म्हटले की  दि 29 रोजी आ. राम शिंदे यांनी गौण खनिज प्रकरणी कारवाईमध्ये कुचराई केली म्हणून विधान परिषदेत प्रश्न उपस्थित करत तालुक्यातील दोन महत्त्वाच्या पदावर लोकाभिमुख, प्रशासकीय कार्य करणार्‍या अधिकार्‍याचे निलंबन करता पण या अधिकार्‍यांनी खडी क्रशरवाल्यांना 48 कोटी रुपयांचा दंड केला नाही का? असा प्रश्न उपस्थित करत कर्तव्यदक्ष अधिकारी वर्गाच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभे राहू असे म्हटले. कर्जत येथे महाविकास आघाडीने आयोजित अधिकारी निलंबन कारवाई निषेध मोर्च्या सह समर्थन रॅलीत राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी सह कर्जत शहरातून मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक सामील झाले होते. यावेळी शिरस्तेदार मच्छिंद्र पाडळे यांनी निवेदन स्वीकारले.

No comments:

Post a Comment