वाहतूक व विक्रीस बंदी असणारा 5,500 किलोचा “मंगुर” मासा जप्त. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, December 29, 2022

वाहतूक व विक्रीस बंदी असणारा 5,500 किलोचा “मंगुर” मासा जप्त.

 वाहतूक व विक्रीस बंदी असणारा 5,500 किलोचा “मंगुर” मासा जप्त.

स्थानिक गुन्हे कडून 28 लाखाचा मुद्देमाल ताब्यात.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः केंद्र सरकारने विक्री आणि वाहतुकीस बंदी घातलेले 5 हजार 500 किलो वजनाचे मांगूर जातीचे मासे नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केले. मासे व टेम्पो असा 28 लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. दिपनकर परेश देबनाथ आणि आल्लदिन जायनाल रपतान (दोघेही रा. बिथारी नॉर्थ, परगनस, पश्चिम बंगाल) या दोघांना ताब्यात घेतले. मांगूर जातीचे जीवंत मासे पोलिसांनी जप्त केला. हा मासा सोलापूर येथील शेततळ्यातून काढून तो मध्यप्रदेशातील इंदौर येथे घेवून जात असल्याची कबुली दोघांनी दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. अवैध धंद्याची माहिती घेत असताना पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना सोलापूरहून नगरच्या दिशेने येणार्‍या टेम्पोत बंदी असलेला मांगूर मासा येत असल्याची माहिती खबन्याकडून मिळाली. नगर तालुका व गुन्हे शाखेच्या पोलिसांचे पथक कारवाईसाठी तत्काळ रवाना करण्यात आले.
जिल्हा मत्सय अधिकार्‍यांनी तपासणी केल्यानंतर जप्त मासा हा मांगूर असल्याचे निष्पन्न झाले. या जातीच्या माशापासून भारतीय माशांचे प्रजातीला व पर्यावरणाला धोका असुन मत्सपालन, विक्री व वाहतुकीस बंदी आहे असा अभिप्राय मत्सय अधिकार्‍यांनी दिला. 8 लाख 25 हजाराचा मांगूर मासा, लाखाचा आयशर टेम्पो असा 28 लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अनिल कटके, सहाय्यक पोलिस निरीक्षक दिनकर मुंडे, सहाय्यक फौजदार मनोहर शेजवळ, हवालदार दत्तात्रय हिंगडे, बापुसाहेब फोलाणे, दत्तात्रय गव्हाणे, संदीप घोडके, देवेंद्र शेलार, शंकर चौधरी, ज्ञानेश्वर शिंदे, रोहित मिसाळ, कमलेश पाथरूट, भाग्यश्री भिटे, सारीका दरेकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

No comments:

Post a Comment