पारनेरवासीयांना सेनापती बापट पतसंस्थेचा आधार ः राजेंद्र ठोकळ. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, November 25, 2022

पारनेरवासीयांना सेनापती बापट पतसंस्थेचा आधार ः राजेंद्र ठोकळ.

 पारनेरवासीयांना सेनापती बापट पतसंस्थेचा आधार ः राजेंद्र ठोकळ.

 सुरत शाखेचा शुभारंभ.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
पारनेर ः सुरत जिल्ह्यात पारनेर तालुक्यातील नागरिकांची संख्या मोठी आहे.येथील मुख्य बाजारपेठेत विविध व्यावसायिक आपल्या भागातील आहे या ठिकाणी आपल्या भागातील संस्था असावी अशी आम्ही संस्था व्यवस्थापनाकडे मागणी केली होती ती आता पुर्ण झाली आहे सुरतसिथ्त पारनेरवासीयांना सेनापती बापट पतसंस्थेचा आधार होईल आसे मत नगरसेवक राजेंद्र ठोकळ यांनी व्यक्त केले. सुरत जिल्ह्यातील मुख्य शहरातील सरदार मार्केट मधील जागेत सेनापती बापट पतसंस्थेच्या नुतन शाखेचे उद्घाटन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी बाजापेठेतील जेष्ठ व्यापारी दशरथ, संदिप साळुंखे, संदीप घालमे, महेंद्र पवार, विजय भापकर, सुरज सुद्रिक, अ‍ॅड मंगला पटेल, नगरसेवक डॉ.रविंद्र पाटील, संस्थेचे संचालक बाबाजी तनपुरे, मुख्य कार्यकारी अधिकारी बापूसाहेब झंजाड, संपत औटी, मिनानाथ शिंदे, गणेश पोटघन, सुरेश जाधव, सुभाष गवळी, गिताराम रूईकर,पल्लवी श्रीमंदीलकर,प्रियंका ठुबे,दत्ता लंके, सुरेश खरमाळे उपस्थित होते.
झंजाड म्हणाले, संस्थेकडे 160 कोटी रूपयांच्या ठेवी आहेत.96 कोटी रूपयांचे कर्ज वाटप केले आहे.34 कोटी रूपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे संस्थेने लखपती योजना,पेन्शन ठेव योजना यासंह अन्य ग्राहकांच्या हिताच्या योजना सुरू केल्या आहेत यामुळे ग्राहकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.संस्थेने खात्यातील व्यवहार समजण्यासाठी मोबाईल अ‍ॅप कार्यन्वित केले असुन क्यु आर कोड द्वारे खात्यावरती पैसे मागविण्याची व्यवस्था सुरू करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment