टाकळी ढोकेश्वर अपंग शाळेत खा. सुजय विखेंचा वाढदिवस साजरा. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, November 25, 2022

टाकळी ढोकेश्वर अपंग शाळेत खा. सुजय विखेंचा वाढदिवस साजरा.

 टाकळी ढोकेश्वर अपंग शाळेत खा. सुजय विखेंचा वाढदिवस साजरा.

किरण कोकाटे यांनी केले शालेय साहित्य वाटप.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
पारनेर ः नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. सुजय विखे यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण मतिमंद,अपंग अनाथ मुखबधीर विद्यालय, टाकळी  ढोकेश्वर या ठिकाणी  विद्यार्थ्याना शालेय साहित्य, खाऊ वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रम प्रसंगी पारनेर  पोलीस निरीक्षक घनश्याम बळप, पारनेर भाजपा तालुकाध्यक्ष वसंत चेडे, डॉ. भाऊसाहेब खिलारी, पारनेर भाजपा शहराध्यक्ष किरण कोकाटे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी घनश्याम बळप म्हणाले टाकळी ढोकेश्वर येथील अपंग शाळेमध्ये दुर्बल घटकांना मदत पोहोचावी हा उद्देश ठेवून खासदार सुजय विखे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत किरण कोकाटे यांनी अपंग मतिमंद दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप करत वाढदिवसानिमित्त चांगला उपक्रम राबवला आहे अशाच प्रकारचे उपक्रम राबवणे काळाची गरज आहे. भाजपा तालुका अध्यक्ष वसंत चेडे म्हणाले नगर दक्षिणचे क्रियाशील विकास पुरुष खासदार सुजय विखे यांचा वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्चाला फाटा देत तालुक्यात एक आदर्श असा वाढदिवस भाजप पदाधिकार्‍यांनी साजरा केला. सामाजिक उपक्रम राबवत वाढदिवसानिमित्त सामाजिक हित जोपासत आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न पारनेर भाजपच्या वतीने करण्यात आला आहे. पारनेर मध्ये खर्‍या अर्थाने खासदार विखे यांचा वाढदिवस समाज सेवा म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रम प्रसंगी खरेदी-विक्री संघाचे मा. व्हा चेअरमन बाबासाहेब खिलारी, युवा नेते संतोष शेलार, राजूशेठ ठुबे, सुनील थोरात, सागर मैड, लोंढे दादा, मोहनराव रोकडे, स्वप्नील औटी, अक्षय देशमुख, विकी दाते, सुनील कोकाटे, बाबासाहेब चेडे, गणेश जगदाळे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment