जामखेड येथील बांधकाम कामगारांना सुरक्षा पेटी कीट वाटप - अरिफ गुलाम शेख - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Sunday, September 11, 2022

जामखेड येथील बांधकाम कामगारांना सुरक्षा पेटी कीट वाटप - अरिफ गुलाम शेख

 जामखेड येथील बांधकाम कामगारांना सुरक्षा पेटी कीट वाटप - अरिफ गुलाम शेख


जामखेड -
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ जामखेड येथील सामाजिक कार्यकर्ते  आरीफ गुलाम शेख यांच्या सहकार्याने तालुक्यातील नऊ बांधकाम कामगारांना सुरक्षा कीट पेटी वाटप करण्यात आले .काही एजंट च्या मार्फत फसवणुक होत होती व पैसे ची पण मागणी होत होती यामुळे अरीफ भाई शेख यांनी कामगार लोकांना फसवणूक पासून न्याय मिळवून देण्याचे कार्य केले. 
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ यांच्या वतीने समाजिक कार्यकर्ते आरीफ गुलाब शेख यांच्या सहकार्याने जामखेड येथील लाभार्थी वसीम जाफर शेख ,नफिसा जाफर शेख ,मोहसीन नजिर शेख ,जावेद मुश्ताक शेख ,आफताब दाऊद शेख ,जाबीर नजीर कुरेशी,यासीन कादर शेख आसीफ गुलाम शेख, व आनखी एक आशा नऊ बांधकाम कामगारांना सुरक्षा पेटी वाटप करण्याचा कार्यक्रम शहरातील काझी गल्ली या ठिकाणी पार पडला. सदर सुरक्षा पेटीत तेरा प्रकारचे साहित्य असून नोंदणीकृत बांधकाम कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण  मंडळ यांच्या सहकार्याने हा लाभ देण्यात आला. 
या वेळी माजी नगरसेवक आर्शद आयुब शेख ,आवेज शेख, मुन्ना सय्यद, मन्नान सय्यद ,शफी सय्यद, समिर उर्फ बबलू सय्यद, वसीम सय्यद ,अर्जुन म्हत्रे,सद्दाम सय्यद ,आरीफ शेख मोसीन शेख सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment