गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांचा ग्रामसेवक यांना आदेश. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, August 13, 2022

गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांचा ग्रामसेवक यांना आदेश.

 गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांचा ग्रामसेवक यांना आदेश.

शिऊर येथील नियोजित बौध्द विहार बांधकाम संदर्भात अंदोलन...


जामखेड -
जामखेड तालुक्यातील  शिऊर दलितवस्ती सुधार योजना अंतर्गत बौध्द विहार काम मंजुर झालेले असुन सदर ग्रामस्थाची मागणी आहे की सदरचे काम हे स्थानिक व्यक्तीमार्फत काम करु नये ( सब ठेकेदारा मार्फत काम करु नये ) या बाबत तक्रार अर्ज देण्यात आलेला असुन मुळ ठेकेदार यांनी काम करावे तरी तुम्ही मुळ ठेकेदारास सुचना देऊन वरील विषय योग्य रितीने मार्गी लावावा व तसा अहवाल या कार्यालयात सादर करण्यात यावा व ग्रामस्थ उपोषणास न बसण्या पासुन प्रवृत्त कसे होतील या बाबत गार्भीय पुर्वक लक्ष देऊन योग्य ती कार्यवाही करण्यात यावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयात त्वरीत सादर करण्यात यावा . असा आदेशच जामखेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी शिऊर ग्रामपंचायतचे ग्रामसेवक यांना दिला आहे. 
जामखेड तालुक्यातील शिऊर येथील बौध्दविहाराचे बांधकाम सब ठेकेदारा मार्फत केल्यास ग्रामस्थांचा तिव्र उपोषण करण्याचा इशारा  दिला आहे.  याबाबत मागासवर्गीय ग्रामस्थांच्या वतीने जिल्हाधिकारी अहमदनगर तहसीलदार, गटविकास अधिकारी जामखेड यांना निवेदन दिले असल्याचे  सांगण्यात आले होते.
या बाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतंर्गत सन २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी शिऊर येथे बौद्ध विहार बांधकाम करणे कामी १० लक्ष रुपयास मान्यता मिळालेली असुन, कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. हे काम लवकरच सुरू होण्याच्या स्थितीत आहे. या मंजुर झालेल्या बौध्द विहाराचे बांधकाम दर्जेदार व उत्कृष्ठ दर्जाचे व्हावे  ही शिऊर येथील सर्व अनुसूचित जाती ग्रामस्थांची इच्छा आहे . परंतु, असे निदर्शनास आले आहे की , सदर कामासाठी श्री हजारे यांच्या संस्थेची निविदा मंजुर झाली आहे, परंतु प्रत्यक्षात सदर बांधकाम मुळ ठेकेदार स्वतः न करता , शिऊर येथील स्थानिक व्यक्तीमार्फत ( सब ठेकेदारा मार्फत ) करणार आहेत . असे प्रथम दर्शनी समजते आहे. त्यामुळे बौध्द विहाराचे बांधकाम दर्जेदार व उत्कृष्ठ दर्जाचे होणेबाबत शंका निर्माण झाली आहे. या निवेदना मार्फत आपले लक्ष वेधण्यात येते की व, यापुर्वी शिऊर ग्रामपंचायत अंर्तगत दलित वस्ती सुधार योजनेच्या कामामध्ये स्थानिक व्यक्तीमार्फत अपहार ( भ्रष्टाचार ) करुन, काम निकृष्ठ दर्जाचे झालेले आहेत . तथापि , समस्थ ग्रामस्थांनी मोठया प्रमाणात उपोषण आंदोलन केले होते . त्यावेळेस काही समाकंटकांनी दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे गावामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता.
यामुळे आपणास विनंती करण्यात येत आहे की, सदर बौध्द विहाराचे बांधकाम दर्जेदार व उत्कृष्ठ दर्जाचे व्हावे यासाठी स्थानिक व्यक्तीमार्फत (सब ठेकेदारा मार्फत) न करता , मुळ ठेकेदार यांनी स्वतः करावे . अशी सर्व अनु . जाती ग्रामस्थ , शिऊर यांची इच्छा आहे . सदर काम स्थानिक व्यक्तीमार्फत ( सब ठेकेदारा मार्फत ) केल्याचे निदर्शनास जातीतील ( पुरुष , महिला ज्ञात - अज्ञात ) सर्व ग्रामस्थ शिऊर यांच्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन उपोषण करण्यात येईल , तसेच आंदोलन , उपोषणामुळे पुन्हा गावात स्थानिकांमध्ये मतभेद होऊ शकतात व त्यामुळे , कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भावू शकतो व तसे नाकारता येत नाही . करण्यास सुरुवात व आल्यास , केल्यास सर्व अनु . पुनच्छ : आपणास विनंती करण्यात येते की , सदर कामात प्रशासनाने वेळीच लक्ष घालावे व भविष्यात काही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी प्रयत्न करावे ही अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. सदर निवेदनावर मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांच्या सह्या आहेत. 
या निवेदन वजा तक्रार अर्जावरून गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी शिऊर ग्रामपंचायतचे ग्रामसेवक यांना वरील प्रमाणे आदेश दिला आहे. यावर शिऊर येथील ग्रामसेवक कोणता निर्णय घेतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here