कुंभारगल्ली तील कारवाई विरोधात क्षीरसागर कुटुंबियांचे आमरण उपोषण. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, August 4, 2022

कुंभारगल्ली तील कारवाई विरोधात क्षीरसागर कुटुंबियांचे आमरण उपोषण.

 कुंभारगल्ली तील कारवाई विरोधात क्षीरसागर कुटुंबियांचे आमरण उपोषण.


कर्जत -
कुंभारगल्लीतील पश्चिम पुर्व व उत्तर दक्षिण असा रस्ता अतिक्रमण काढुन खुला करावा सिटीसर्व्हे मार्फत रस्ता न मोजता सुरू असलेली रस्ता करण्याची कार्यवाही थांबवावी, या रस्त्यावरील सर्वच अतिक्रमणे काढले शिवाय रस्त्याचे काम करण्यास हरकत घेत क्षीरसागर कुटुंबियानी मंगळवार दि.०२/०८/२०२२ रोजी सकाळी ११ वा पासून नगरपंचायत कर्जत समोर अमरण उपोषण सुरू केले असून यामध्ये आशा बाळासाहेब क्षीरसागर यांचे सह अमोल बाळासाहेब क्षीरसागर, अजिंक्य बाळासाहेब क्षीरसागर, हर्षदा अमोल क्षीरसागर, ऋतुजा अजिंक्य क्षीरसागर आदी सहभागी झाले आहेत, सलग दोन दिवस उपोषण करूनही मार्ग निघू शकला नाही.
याबाबत माहिती देताना अमोल क्षीरसागर म्हणाले की गेली अनेक वर्षांपासून हा रस्ता मंजूर आहे मात्र त्याची मोजणी करून रस्ता करणे आवश्यक असताना नगरपंचायत ने केलेल्या पंचनाम्यात खोट्या सह्या घेऊन आमच्या कुटुंबीयांचा जबाब न घेता कार्यवाही केली आहे या रस्त्या वर आमच्या चार ठिकाणी जागा असताना आम्हाला मात्र याबाबत माहिती देण्यात आली नाही, या बाबत अनेक तक्रारी अर्ज करून ही त्याकडे दुर्लक्ष केले जात असून नगर पंचायतचे मुख्याधिकारी सूड बुद्धीने व राजकीय दबावाखाली फक्त आमच्यावर कारवाई करत आहेत, रस्ता करण्याला आमचा विरोध नाही मात्र सिटी सर्व्हेच्या नकाशा प्रमाणे नियमात  मोजणी करण्या ऐवजी मनमानी पद्धतीने रस्ता करण्याची प्रशासन घाई करत असून बळाचा वापर करून आमच्यावर अन्याय केला जात आहे. आंदोलन कर्त्याशी मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी बोलण्याचा प्रयत्न केला मात्र त्यातून तोडगा निघू शकला नाही, या बाबत जाधव यांनी म्हटले की कुंभार गल्लीतील रहिवाशिय यांची रस्ता करण्याची मागणी आहे, आगामी काळात गणेशोत्सव महालक्ष्मी या सणासाठी येथे वर्दळ राहणार आहे मात्र हे कुटुंब जाणून  बुजून विरोध करत आहेत. नियमानुसार रस्त्याचे काम केले जाणार असून मोजणी नंतर इतर अतिक्रमणावर कारवाई केली जाईल. 
सदरचे आंदोलन दोन दिवस करूनही यातून कोणताही मार्ग निघू शकला नाही या आंदोलनात राष्ट्रीय समाज पक्ष वृद्ध भूमिहीन महिला शेतमजूर संघ नाव वंचित बहुजन आघाडी यांनी पाठिंबा दिला असून सदर आंदोलनाकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे असे आवाहन या संघटनांनी केले आहे.

No comments:

Post a Comment