स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त जामखेड मध्ये भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, August 12, 2022

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त जामखेड मध्ये भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन.

 स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त जामखेड मध्ये भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन.

जामखेड मध्ये घरो घरी तिरंगा रॅलीचे  उद्घाटन तहसीलदार  योगेश चंद्रे यांच्या हस्ते संपन्न.


जामखेड -
सर्व प्रशासकीय विभागाचा तिरंगा रॅली मध्ये सहभाग.स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत स्वराज महोत्सव उपक्रमांतर्गत घरो घर तिरंगा हा उपक्रम दि 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाचे उद्घाटन सतरा महाराष्ट्र बटालियन एनसीसी अनगर जामखेड विभाग एनसीसी रॅलीच्या उद्घाटन उत्साह पूर्ण देशभक्ती वातावरणात जामखेडचे कर्तव्य तहसीलदार योगेश चंद्रे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सर्व प्रशासकीय 21 विभागातील अधिकारी,कर्मचारी, शिक्षक एनसीसी कॅडेट,विद्यार्थी, विद्यार्थीनी यांच्या उपस्थितीत करण्यात आले करण्यात आले. यावेळी जामखेड तहसील कार्यालय मार्फत हर घर तिरंगा संदर्भात नियम अटी व ध्वज संहिता सूचनांचे पत्रक ग्रामस्थांना देण्यात आले. जामखेड नगरपरिषदेने तिरंगा रथाची  सजावट केलेली होती.  
रॅलीचे मुख्य आकर्षण 150 एनसीसी कॅडेट ने अतिशय थाटामाटा तिरंगा ध्वजाचे संचलन संपूर्ण जामखेड शहरातून करण्यात आले यावेळी संपूर्ण जामखेड शहर भारत माता की जय, हर घर तिरंगा, देश की शान तिरंगा, हमारी जान तिरंगा, वंदे मातरम या घोषणेने दुमदुमून निघाले. जामखेड करांनी या रॅलीचे ठिकठिकाणी स्वागत केले. जामखेड तहसील कार्यालय यांच्या मार्गदर्शनाखाली सतरा महा बटालियन एनसीसी अ नगर जामखेड विभाग,
 मुख्याधिकारी नगरपरिषद जामखेड, गटविकास अधिकारी जामखेड, पोलीस निरीक्षक  पोलीस स्टेशन जामखेड, तालुका कृषी अधिकारी जामखेड, उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग जामखेड, उपअभियंता जि.प.पाणी पुरवठा जामखेड, उपअभियंता लघू पाटबंधारे (स्था . स्तर) जामखेड, उपअभियंता म.रा.वि.कं. जामखेड, उपअभियंता जि. प. सा. बा. जामखेड, सामाजिक वनीकरण जामखेड, आगार प्रमूख एसटी महामंडळ जामखेड, सहा. निबंधक सह. सं. जामखेड, उपअधिक्षक भुमिअभिलेख जामखेड, गटशिक्षण अधिकारी जामखेड, दुय्यम निबंधक जामखेड, तालूका आरोग्य अधिकारी जामखेड, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी जामखेड, उपअभियंता मृदा व जलसंधारण उपविभाग जामखेड, पशूसंवर्धन अधिकारी जामखेड, उपअभियंता लघू पाटबंधारे जामखेड, जामखेड महाविद्यालय, श्री नागेश विद्यालय, लना होशिंग विद्यालय, कन्या विद्यालय जामखेड  या विभागातील अधिकारी कर्मचारी ग्रामस्थ, पत्रकार यांनी मोठ्या उत्साहात तिरंगा रॅलीमध्ये सहभाग घेतला.
रॅलीचा समारोप जामखेड तहसील कार्यालयामध्ये झाला. जामखेड चे तहसीलदार योगेश चंद्रे  यांनी रॅलीला संबोधन करताना हर घर तिरंगा हा उपक्रम अतिशय उत्साहामध्ये साजरा करावा व ध्वजाची आचारसंहिता पाळून सर्वांनी घरावर ध्वज लावावेत असे आवाहन केले. नंतर ध्वज प्रतिज्ञा घेऊन राष्ट्रगीताने समारोप केला.

No comments:

Post a Comment