सत्ता असो वा नसो तालुक्याच्या हितासाठी संघर्ष करत वाटचाल सुरू ठेवणार. - मा मंत्री शंकरराव गडाख - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, July 11, 2022

सत्ता असो वा नसो तालुक्याच्या हितासाठी संघर्ष करत वाटचाल सुरू ठेवणार. - मा मंत्री शंकरराव गडाख

 सत्ता असो वा नसो तालुक्याच्या हितासाठी संघर्ष  करत वाटचाल सुरू ठेवणार. - मा मंत्री शंकरराव गडाख

सोनईतील संवाद मेळाव्यास भर पावसात हजारो गडाख समर्थकांची उपस्थिती.


सोनई -
मला आपल्याशी बोलायचंय या मथळ्याखाली सोशिअल मीडियात मा मंत्री शंकरराव गडाख यांचे वतीने नेवासा तालुक्यातील कार्यकर्ते यांना सोम दि 11 जुलै 2022 रोजी सोनई येथे मिटिंगसाठी निमंत्रित करण्यात आले होते.राज्यातील  सदय राजकीय  स्थितीत व कायम मंत्री शंकरराव गडाख व त्यांचे कुटुंबीय यांचेवर होणारे राजकीय हल्ले या विषयांवर मंत्री शंकरराव गडाख काय निर्णय घेतात याकडे नेवासा तालुक्यातील नागरिकांसह राज्यातील नागरिकांचे लक्ष लागले होते. गेल्या 2 ते 3 दिवसापासून नेवासा तालुक्यात पाऊस असूनही भर पावसात हजारो कार्यकर्ते तरुणांपासून ते जेष्ठांपर्यत हजारोंच्या संख्येने संवाद मेळाव्यासाठी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ  नेते मा खा यशवंतराव गडाख होते.याप्रसंगी बोलतांना जेष्ठ नेते यशवंतराव गडाख म्हणाले सत्ता असताना कार्यकर्ते बरोबर असतात परंतु आज मंत्रीपद जावूनही मोठ्या संख्येने  आपण उपस्थित आहात हीच संघटनेची ताकद आहे.सत्ता बदलाच्या धर्तीवर अनेकांनी भूमिका बदलल्या परंतु शंकरराव यांनी दिलेला शब्द पाळून उद्धव ठाकरे यांचे बरोबर राहत शब्द काय असतो हे दाखवून दिले.तालुक्यातील पहिल्यांदा मिळालेले कॅबिनेट मंत्री पद अडीच वर्ष तालुक्यातील विविध योजना विकास कामे पूर्ण करण्यासाठी वापरले.राजकीय जीवनात अनेक संकटे आली परंतु नेवासा तालुक्यात शंकरराव यांना जो राजकीय हेतूने त्रास देण्यात आला तो निषेधार्थ असा आहे.भविष्यात येणाऱ्या जीप,प स निवडणुका ,नगर पंचायत निवडणुका मोठ्या ताकदीने तुमच्या सर्वांच्या बळावर जिंकू यापुढील काळातही शंकरराव यांना साथ द्या असे म्हणाले.याप्रसंगी बोलतांना मा मंत्री शंकरराव गडाख म्हणाले अभूतपूर्व राजकीय परिस्थिती निर्माण झाली होती त्यामुळे काय निर्णय घ्यावा याचे मोठे दडपण होते.आत्तापर्यंतची वाटचाल खूप संघर्षातुन गेली.नगर नेवासा, नेवासा स्वतंत्र अश्या दोन निवडणूका तत्वाशी तडजोड केली नाही म्हणून पराभूत झालो  पण तरीही संघर्ष सुरू ठेवला.2019 च्या निवडणुकीत अपक्ष म्हणून आपल्या बळावर निवडून आलो.एका पक्षाचे पक्ष प्रमुख असून देखील सरळ व दिलेला शब्द पाळणारे उद्धव ठाकरे यांच्यामुळे कॅबिनेट मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली.राजकारणात फार काही मिळवायचे ही अपेक्षा मुळीच नव्हती परंतु मा खा यशवंतराव गडाख यांनी सुरू केलेली विकासाची गती निरंतर सुरू ठेवत जनतेसाठी लढायचे व जनतेत राहायचे आहे ही खूणगाठ मनाशी बांधिली होती.कॅबिनेट मंत्री पद मिळाल्याने तालुक्यातील गावागावातील पाणी योजना,लिफ्ट योजना नूतनीकरण, ग्रामीण रुग्णालये,वीज  सबस्टेशन ,गावा गावांतील रस्ते यांना मोठ्या प्रमाणावर निधी आणून कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न केला नेवासा तालुक्याच्या शेती प्रश्नासाठी महत्वाचा असणारा मुळा उजवा कालवा नुतनीकरणासाठी 70 कोटी निधीचा पाठपुरावा केला यात फक्त मंजुरी आदेश निघणे बाकी आहे.तालुक्यातील 1000 शेतकऱ्यांचा पोटखरब्याचा विषय मार्गी लावला,शासकीय जागेवर असलेल्या अतिक्रमणामुळे व्यवसायिक,नागरिक यांना विस्थापित होण्याची वेळ आली होती परंतु राजकीय ताकद वापरून सर्वसामान्य जनतेला न्याय देत त्यांच्या जागा वाचवल्या.मंत्री होऊन देखील ताफा डामडौल या गोष्टी ज्या जनतेमुळे मिळाल्या त्यांच्या समोर कधीही त्याचे प्रदर्शन केले नाही.मी मंत्री असूनही कधी सूडबुद्धीने वागलो नाही तरीही विरोधकांनी राजकीय सूडबुद्धीने त्रास देऊन कोर्टात खोट्या नाट्या केसेस दाखल करून व्यक्तिगत त्रास देऊन राजकीय जीवनातून उठवण्याचा प्रयत्न केला पण मी विकासकामांचे व्हिजन घेतल्याने सर्व संकटे स्वतः झेलली.आज सत्तेत नसून देखील आपण हजारोंच्या संख्येने उपस्थित आहात हीच माझी व संघनटनेची ताकद आहे.उद्धव ठाकरे यांनी विश्वास दाखवला होता त्यामुळे त्यांची ऐनवेळी साथ सोडली  नाही सरळमार्गी काम काम करणाऱ्या माणसाबरोबर राहण्याची भूमिका घेतली.यापुढील काळातही सत्ता असो व नसो नेवासा तालुक्यातील जनतेच्या प्रश्नांसाठी संघर्ष सुरू ठेवणार असून  तालुक्यातील विरोधकांनी कितीही त्रास दिला तरी सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नासाठी लढा देणार.पुढील अडीच वर्षे अजून जर मंत्री पद राहिले असते तर निश्चितच नेवासा तालुक्यात एकही विकासकामांचा प्रश्न राहू दिला नसता असे मंत्री शंकरराव गडाख म्हणाले तसेच शंकरराव गडाख यांचेवर विश्वास ठेवून काही दिवसांपूर्वी गडाख यांचेकडे प्रवेश केलेले कार्यकर्ते व उपस्थित कार्यकर्ते यांचे मंत्री गडाख यांनी आभार मानले. सत्ता असो वा नसो सदैव नेवासा तालुक्याच्या हितासाठी संघर्ष सुरू ठेवणार असे मंत्री गडाख म्हणाले.
बाहेर धो धो पाऊस बरसत असून देखील मा मंत्री शंकरराव गडाखांच्या संवाद मेळाव्यास 15 हजार लोक तालुक्यातील सर्वच गावात उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाप्पूसाहेब गायके यांनी केले याप्रसंगी   सुहास गोंटे,अजित मुरकुटे,जानकीराम डौले,मच्छींद्र
म्हस्के,प्रकाश शेटे,संजय सुखदान आदींनी मनोगत व्यक्त केले.

भर पावसात जमले तब्बल 15 हजार कार्यकर्ते.
शंकरराव गडाख यांनी सोशियल मीडियाच्या माध्यमातून मला आपल्याशी बोलायचंय असे आवाहन नेवासा तालुक्यातील कार्यकर्त्यांना केले होते त्यास प्रतिसाद देत नेवासा तालुक्यातील 15 हजार तरुण ,जेष्ठ कार्यकर्ते भर पावसात कार्यक्रमास हजर होते.मा मंत्री शंकरराव गडाखांच्या मेळाव्यास नेवासा तालुक्यातील अभूतपूर्व गर्दी होती.

No comments:

Post a Comment