नेवासा तालुक्यातील 25 गावांना 1कोटी 25 लक्ष रुपयांचे व्यायाम शाळा साहित्य मंजूर. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, July 20, 2022

नेवासा तालुक्यातील 25 गावांना 1कोटी 25 लक्ष रुपयांचे व्यायाम शाळा साहित्य मंजूर.

 नेवासा तालुक्यातील 25 गावांना 1कोटी 25 लक्ष रुपयांचे व्यायाम शाळा साहित्य मंजूर.

आ शंकरराव गडाख यांचा विशेष पाठपुरावा.


नेवासा -
नेवासा तालुक्यातील विविध गावांमधील तरुणांना व्यायामाची आवड निर्माण होऊन तरुण सुदृढ व्हावेत यासाठी  मा मंत्री शंकरराव गडाख यांच्या मार्फत जिल्हा क्रीडांगण योजने अंतर्गत बंदिस्त  व खुले या दोन्ही प्रकारचे नेवासा तालुक्यातील विविध गावांमधील प्रस्ताव क्रीडा विभागाकडे पाठवून त्यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा करण्यात आला त्यास नुकतीच मंजुरी देण्यात आली त्यानुसार
नेवासा तालुक्यातील  25 गावांना महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा क्रीडांगण योजनेअंतर्गत 1 कोटी 25 लक्ष रुपयाचा निधी मंजूर झाला असून संबंधित गावामध्ये या विभागामार्फत साहित्य पोहोच करण्याचे काम सुरू झाले आहे अशी माहिती आ शंकरराव गडाख यांच्या जनसंपर्ककार्यालयातून देण्यात आली.  निंभारी, वडाळा बहिरोबा,उस्थळ दुमला, बहिरवाडी  ,खडका, माका, वरखेड ,राजेगाव, लोहारवाडी , खुपटी, सोनई ,शिंगवेतुकाई ,जेऊर हैबती, पिंप्री शहाली, जळके खुर्द, दिघी, मुकिंदपुर,भेंडा बुद्रुक, गेवराई, भालगाव,बाभुळखेडे, गोंडेगाव, अंतरवली, तरवडी, देडगाव या नेवासा तालुक्यातील गावांना  व्यायाम शाळा साहित्याचा लाभ मिळणार आहे.विविध गावांमधील
 तरुण,मित्रमंडळ यांनी वेळोवेळी  व्यायाम शाळा साहित्याची मागणी आ शंकरराव गडाख यांच्याकडे केली होती. या मागणीची योग्य ती दखल घेऊन आ गडाख यांनी महाराष्ट्र शासनाच्या व जिल्हा क्रीडा योजनेअंतर्गत 1 कोटी 25 लक्ष रुपयांचे व्यायाम शाळा साहित्य मंजूर केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here