बस वेळेवर येत नसल्याने बांधखडक च्या विद्यार्थ्यांचे बस डेपो मध्ये आंदोलन. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, June 23, 2022

बस वेळेवर येत नसल्याने बांधखडक च्या विद्यार्थ्यांचे बस डेपो मध्ये आंदोलन.

 बस वेळेवर येत नसल्याने बांधखडक च्या विद्यार्थ्यांचे बस डेपो मध्ये आंदोलन.

जामखेडचे अगार प्रमुख म्हणतात पत्रकारांना प्रतिक्रिया नको पिडा मागे लागते.


जामखेड -
शाळा सुरू झाल्या पासून बांधखडक येथील ४८ विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी एस टी बस वेळेवर येत नसल्याने संतप्त झालेल्या पालक, ग्रामस्थ व विद्यार्थींनी बस डेपो अगारात ठीय्या मांडुन आंदोलन केले. वरील बाबत जामखेड अगार प्रमुख यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार देऊन प्रतिक्रिया दिली तर पीडा मागे लागते आसे उलट उत्तर पत्रकारांना दिले.
तालुक्यातील बांधखडक येथील ४८ विद्यार्थी तसेच याच रोडवरील कोल्हेवाडी येथील ८ ते ९ विद्यार्थ्यी व आनंदवाडी येथील २९ विद्यार्थी आसे एकुण ७५ विद्यार्थी १२ की. मी अंतरावर आसलेल्या राजुरी येथील न्यू इंग्लिश स्कूल या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. मात्र शाळा चालू झाल्यापासून या तीनही गावांना एकच आसलेली बस वेळेवर येत नाही त्यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी पालक व ग्रामस्थांसह आज दि २३ रोजी दुपारी दोन वाजता जामखेड येथील जुन्या बस डेपो मध्येच ठीय्या आंदोलन केले. यावेळी विद्यार्थ्यांन सह ग्रामस्थांनी बोलताना सांगितले की जामखेड येथिल एस टी प्रशासन व शाळा प्रशासन या गोष्टी कडे लक्ष देत नाही. वेळेवर बस येत नसल्याने विद्यार्थ्यांची शाळा बुडते, दोन दोन तास एस टी ची वाट पहात बसावे लागते. विद्यार्थ्यांच्या होत आसलेल्या शैक्षणिक नुकसानाला जबाबदार कोण? जामखेड एस टी अगार प्रमुख महादेव क्षिरसाठ यांना या बाबत ग्रामस्थांनी जाब विचारला असता त्यांनी ग्रामस्थांच उलट उत्तरे दिली आम्हाला एस टी ला डीजेल लागते, डीजेलला पैसै नाहीत, एस टी ची वेळ एडजेस होत नाही आसे असमाधान कारक उत्तरे मिळाल्याने काही दिवसातच पुन्हा जामखेड मध्ये रास्तारोको आंदोलन करण्यात येणार आहे असे सांगितले.
या आंदोलनामध्ये बांधखडक चे उपसरपंच तानाजी फुंदे, ग्रा. सदस्य अमोल मुरकुटे, मंगेश वारे, विजय वारे, अर्जुन दराडे, विशाल पैडमल, अनिल पैडमल, गोवर्धन पैडमल, काका वारे, आर्यन वारे, आदीक कदम, संगीता वारे, शितल वारे, रेखा वारे, रुपाली पारे व कांताबाई घोडके सह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पत्रकारांना प्रतिक्रिया दिली तर पीडा मागे लागते. 
बांधखडक येथील विद्यार्थ्यांनी आज एस टी डेपो मध्ये केलेल्या आंदोलनाबाबत जामखेड चे अगार प्रमुख महादेव शिरसाठ यांनी आपली प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. या वेळी पत्रकारांना का प्रतिक्रिया देत नाहीत आसे विचारले असता त्यांनी सांगितले की पत्रकारांना प्रतिक्रिया दिली तर पीडा मागे लागते आसे उलट उत्तर दिले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here