मनपा पतसंस्थेच्या सभासदांनी कोरोना च्या काळात केली नगरकरांची सेवा: चेअरमन बाळासाहेब गंगेकर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, May 2, 2022

मनपा पतसंस्थेच्या सभासदांनी कोरोना च्या काळात केली नगरकरांची सेवा: चेअरमन बाळासाहेब गंगेकर

 मनपा पतसंस्थेच्या सभासदांनी कोरोना च्या काळात केली नगरकरांची सेवा: चेअरमन बाळासाहेब गंगेकर

कोरोना च्या काळात मृत्यू पावलेल्या सभासदांच्या वारसांना आर्थिक मदतीचा धनादेश
मनपा पतसंस्थेच्या वार्षिक सभेमध्ये तातडीच्या कर्जमध्ये करणार वाढ


अहमदनगर-
कोरोनाच्या संकट काळामध्ये मनपा पतसंस्थेच्या सभासदांनी नगरकरांना लाईट,पाणी, स्वच्छता व आरोग्याची चांगली सेवा दिली आपल्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य चोख पणे पार पडले काही सभासद आपले कर्तव्य पार पडत असताना दुर्दैवी मृत्यू पावले परंतू मनपा पतसंस्थेने सभासदा बद्दल असलेले कर्तव्य पार पाडण्यासाठी 19 सभासदांच्या वारसांना मदतीचा हात देण्यासाठी आर्थिक धनादेश देण्यात आला.
पतसंस्थेने नेहमीच सभासदांचे हित जोपासण्यासाठी संचालक मंडळ वर्षभर विविध निर्णय घेत असतात मनपा पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सभासदांच्या तातडीच्या कर्ज मर्यादा वाढवली जाणार असल्याचे प्रतिपादन चेअरमन बाळासाहेब गंगेकर यांनी केले.
         कोरोनाच्या काळामध्ये मनपा पतसंस्था सभासद आपले कर्तव्य पार पाडत असताना दुर्दैवी मृत्यू पावलेल्या सभासदांच्या वारसांना आर्थिक मदतीचा धनादेश सुपूर्त करताना चेअरमन बाळासाहेब गंगेकर, व्हाईस चेअरमन प्रमिलाताई पवार, जितेंद्र सारसर, बाबासाहेब मुदगल, सतिष ताठे,विजय कोतकर , शेखर देशपांडे, किशोर कानडे, विकास गीते, बलराज गायकवाड, सोमनाथ सोनवणे, बाळासाहेब पवार, उषाताई वैराळ, कैलास चावरे, गुलाब गाडे,कार्यलक्षी संचालक आनंद तिवारी,आदी उपस्थित होते.
      व्हाईस चेअरमन प्रमिला पवार म्हणाले की कोरोणाच्या काळात मनपा पतसंस्थाचे 19 सभासद आपले कर्तव्य बजावत असताना दुर्दैवी मृत्यू पावले त्यांच्या वारसांना मदतीचा हात देणे आमचे कर्तव्य आहे. म्हणून सर्वांना आर्थिक मदत केली आहे यापुढील काळातही सभासदांचे विविध विषय मार्गी लावू असे ते म्हणाले. कोरोनाचा काळात मृत्यू पावलेल्या राधिका कुलकर्णी, विश्वास जगधने,ढोल्या खाशा चव्हाण, यांच्या वारसांना आर्थिक मदतीचा हात दिला.

No comments:

Post a Comment