कोतकर आणि ठुबे कुटुंबियांच्या उपोषणाला यश - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, April 15, 2022

कोतकर आणि ठुबे कुटुंबियांच्या उपोषणाला यश

कोतकर आणि ठुबे कुटुंबियांच्या उपोषणाला यश.

केडगाव दुहेरी हत्याकांडातील घटनेत अँड. अजय मिसर यांची नियुक्ती.

अहमदनगर - केडगाव शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांड प्रकरणी ीआयडी अधिकार्‍यांवर गुन्हा दाखल करण्याची परवानगी मिळावी आणि या प्रकरणाचा तपास सीआयडी कडून काढून स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्यात यावा तसेच सरकारी वकील नेमण्यात यावा या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानावर कोतकर आणि दुबे कुटुंबीयांनी उपोषण केले होते.संग्राम संजय कोतकर,प्रमोद आनंदा ठुबे,अमोल शिवाजी येवले,अनिता वसंत ठुबे,डॉ. श्रीकांत चेमटे,किरण रमेश ठुबे,गणेश रंगनाथ कापसे,देविदास भानुदास मोढवे,सुनिता संजय कोतकर यांनी मुंबई येथे आझाद मैदानावर उपोषण सुरू केले होते.

उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी उपोषणकर्त्यांनाची भेट घेऊन त्यांच्या मागण्यांसाठी पाठपुरावा करू असे आश्वासन दिले होते त्या नंतर याबाबत डॉ.गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे पत्र दिले होते. विधी व न्याय विभागाच्या वतीने .१२ एप्रिल, २०२२ रोजी अँड.अजय मिसर यांची नियुक्ती करण्यात येत असल्याचे परिपत्रक काढले आहे. याबाबत डॉ.गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, विधी व न्याय विभागाचे आभार मानले आहेत.

याबाबत सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या डॉ.नीलमताई गोऱ्हे यांचे ठुबे व कोतकर कुटुंबाने आणि नगर शिवसेनेच्या वतीने आभार मानले आहेत.

No comments:

Post a Comment