महिन्याभरात बाजारपेठेतील अतिक्रमण हटविण्यार. - आयुक्त. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, March 30, 2022

महिन्याभरात बाजारपेठेतील अतिक्रमण हटविण्यार. - आयुक्त.

 महिन्याभरात बाजारपेठेतील अतिक्रमण हटविण्यार. - आयुक्त.

मनपा आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर.व्यापार्‍यांनी उपोषण मागे घेतले.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः शहरातील कापड बाजार, मोची गल्ली, घासगल्ली सह बाजारपेठेतील रस्त्यांवर फेरीवाले, हातगाडीवाल्यांचे अतिक्रमणाच्या विरोधात व्यापारी महासंघाच्या मार्गदर्शनाखाली व्यापार्‍यांनी सुरू केलेले उपोषण रात्री उशिराने मनपा आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले. या उपोषणाला शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे या सर्वच राजकीय पक्षांनी पाठिंबा व्यक्त केल्यामुळे आयुक्त शंकर गोरे, उपायुक्त डॉ प्रदीप पठारे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन महिन्याभरात पोलीस बंदोबस्तात बाजारपेठेतील रस्त्यावरील अतिक्रमणे हटविली जाईल असे लेखी आश्वासन दिल्यानंतर व्यापार्‍यांनी आपले उपोषण मागे घेतले.
काल सायंकाळी महापालिका आयुक्त शंकर गोरे, उपायुक्त यशवंत डांगे, पोलिस उपअधीक्षक अनिल कातकाडे, शहर अभियंता सुरेश इथापे, पोलिस निरीक्षक संपत शिंदे यांनी आंदोलकांशी चर्चा केली. यावेळी महासंघाचे अध्यक्ष ईशावर बोरा, वसंत लोढा, शिवसेना शहर प्रमुख संभाजी कदम, काँग्रेसचे शहराध्यक्ष किरण काळे, ज्येष्ठनेते अभय आगरकर, नगरसेवक अनिल शिंदे, भाजपचे शहराध्यक्ष महेंद्र गंधे आदींनी यावेळी चर्चेत भाग घेतला. सुरवातील आयुक्तांनी दरवेळेस प्रमाणे कोणताही ठोस निर्णय नसलेले लेखी पत्र आंदोलकांना दिले. मात्र व्यापारी महासंघाचे समाधान न झाल्याने आंदोलक आधीच संतप्त झाले. महापालिका व आयुक्तांच्या विरोधात सर्वांनी जोरदार घोषण दिल्या. त्यामुळे मनपा प्रशासनाला नमते घ्यावे लागले. व्यापार्‍यांच्या सर्व मागण्या पूर्ण करणारे लिखी पत्र आयुक्तांनी पुन्हा दिल्यावर उपोषण स्थगित करण्यात आले. आयुक्त शंकर गोरे व शहर अभियंता सुरेश इथापे यांनी लिंबूपाण्याचा ग्लास देवून वसंत लोढा व सुभाष बायड यांनी उपोषण सोडले. यावेळी ’जय श्रीराम, जय श्रीराम..., हर हर महादेव, भारतमाता की जय, वंदेमातरम्, व्यापारी एकजुटीचा विजय असो...अशा जोरदार घोषण देण्यात आल्या.
कापड बाजारासह संपूर्ण बाजारपेठेतील अतिक्रमणे कायमस्वरूपी हटवून बाजारपेठ वाचवण्याच्या मागणीसाठी अहमदनगर व्यापारी महासंघाच्या काल सकाळी बेमुदत उपोषण सुरु केले होते. सायंकाळी उशिरा महापालिका आयुक्त शंकर गोरे यांनी आंदोलकांशी चर्चा करून दिलेल्या लेखी आश्वासना नंतर उपोषण स्थगित करण्यात आले. उपोषण कर्त्या व्यापार्‍यांच्या बहुतांशी मागण्या मनपा प्रशासनाने मान्य केल्या आहेत.
बाजारपेठेत मनपाने पोलिस बंदोबस्तात सुरू केलेल्या कारवाईत खंड पडणार नाही, मोची गल्ली मधील स्वच्छतागृहावरील अतिक्रमण एक महिन्यात काढून तेथे पुन्हा स्वच्छतागृह उभारू असे लेखी आश्वासन दिल्यावर दीनदयाळ परिवाराचे संस्थापक वसंत लोढा, मर्चंट बँकेचे व्हाईस चेअरमन सुभाष बायड यांच्या सह व्यापार्‍यांनी सुरु केलेले उपोषण स्थगित केले आहे. जर बाजरपेठेत पुन्हा अतिक्रमणे झाली तर व्यापारी महासंघ पुन्हा उपोषण सुरु करेल, असा इशाराही यावेळी वसंत लोढा यांनी यावेळी दिला. तसेच व्यापार्‍यांवर जर समाजकंटकानी पुन्हा दमदाटी केली तर बजरंग दल शांत बसणार नाही, असा इशाराही कुणाल भंडारी यांनी दिला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here