भावजईचे अपहरण करून धमकी देत दिराचा अत्याचार. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, February 8, 2022

भावजईचे अपहरण करून धमकी देत दिराचा अत्याचार.

 भावजईचे अपहरण करून धमकी देत दिराचा अत्याचार.

विवाहितेची दिरा विरोधात पोलिसांत तक्रार.

श्रीगोंदा - भावजईच्या मुलांना जीवे मारण्याची धमकी देत अत्याचार करणार्‍या नराधम दिरा विरुद्ध अपहरण, अत्याचार करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा श्रीगोंदा पोलीस ठाण्यात नोंदविली आहे.
सदर घटनेची हकीकत अशी की, तालुक्याच्या पश्चिम भागातील एका गावाच्या वाडीवर वास्तव्यास असलेले कुटुंब शेती करून आपला उदरनिर्वाह करत आहे. पीडित महिलेचे पती सासरे हे मोलमजुरी करण्यासाठी जातात. काही दिवसांपूर्वी दुपारी पीडित महिलेचा दीर घरी आला आणि पीडितेच्या मुलांना जीवे मारण्याची धमकी देत राहत्या घरात तिच्याशी जबरी अत्याचार केला. तसेच, घडलेला प्रकार कोणाला सांगितला तर सर्वांना जीवे मारण्याची धमकी तिला दिली. दिनांक 27 जानेवारी रोजी सकाळी 10 वा चे सुमारास पीडिता व तिची सासू कांदा खुरपणी करण्यासाठी मजुरीने गेले असता, दुपारी 2:00 चे सुमारास फिर्यादीचा दीर मोटारसायकल वरती आला आणि त्यांना सांगितले की, घरी बचत गटाचे अधिकारी आले आहेत. त्यासाठी तुला घरी यावे लागेल, म्हणत त्याने तिला त्याचेकडील मोटार सायकलवर बसण्यास सांगितले व त्यानंतर मोटार सायकल घराकडे जाणारे रस्त्याने न घेता दुसर्‍या रस्त्याने घेवुन पीडितेस जीवे मारण्याची धमकी देवुन श्रीगोंदा, चिंभळा मार्गे न्हावरा ता. शिरुर जि.पुणे येथे नेले. तेथे त्याने फिर्यादी च्या गळ्यातील सोन्याचे डोरले व पायातील चांदीचे जोडवे एका दुकानामध्ये 4600/- रुपयास विकले., असे तक्रार अर्जात म्हंटले आहे.
त्यानंतर मोटार सायकलवर सायं 6:00 च्या सुमारास स्वारगेट पुणे येथे नेले.  एका लॉजमध्ये रुम बुक केला. तेथे  पीडितेवर त्याने वेळोवेळी बळजबरीने अत्याचार केला. त्यानंतर स्वारगेट पुणे येथुन महिलेच्या नंदेच्या घरी गेले. तेथे रात्रीचे वेळी पीडितेने घडलेला सर्व प्रकार तिच्या नंदेला सांगितला. यावेळी सदर प्रकार समोर आला. त्यानुसार श्रीगोंदा पोलीस ठाण्यात अपहरणासह महिला अत्याचार व जीवे मारण्याची धमकी असे दिराच्या विरोधात महिलेने तक्रार दाखल केली आहे.

No comments:

Post a Comment