श्रीरामपूर विभागाच्या अप्पर पोलीस अधीक्षकपदी स्वाती भोर. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, January 21, 2022

श्रीरामपूर विभागाच्या अप्पर पोलीस अधीक्षकपदी स्वाती भोर.

 श्रीरामपूर विभागाच्या अप्पर पोलीस अधीक्षकपदी स्वाती भोर.

डॉ. दिपाली काळे यांची बदली.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः श्रीरामपूर विभागाच्या अप्पर पोलीस अधीक्षक पदी स्वाती भोर या बदलून आल्या असून त्यांनी काल डॉ. दिपाली काळे यांच्याकडून पदाचा कार्यभार स्वीकारला. काळे यांची बदली नाशिक येथील महाराष्ट्र पोलिस अकादमीत पोलीस अधीक्षकपदी करण्यात आल्याने त्यांच्या जागी बीडमधील आंबेजोगाई येथील अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
स्वाती भोर यांना तसा नगर जिल्ह्याचा पूर्वानुभव असून  यापूर्वी जिल्ह्यातील संगमनेर येथे उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिलेले आहे. आंबेजोगाई येथे देखील कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी म्हणून त्यांची कारकीर्द चांगली राहिली आहे. काल गुरुवारी स्वाती भोर यांनी दिपाली काळे यांच्याकडून श्रीरामपूर विभागाच्या (उत्तर नगर जिल्हा) अपर पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारला असून  हा वरिष्ठ मंत्र्यांचा उत्तर नगर भाग येतो. शिर्डीचे महत्व मोठे आहे. त्याच बरोबर अवैध वाळू उपसा, गावठी कट्टे आणि श्रीरामपूर, संगमनेर सारखी संवेदनशील शहरे ही परिस्थिती पाहता स्वाती भोर यांना नगर जिल्ह्यात दुसरी टर्म पहावी लागणार आहे.

No comments:

Post a Comment